वीर सावरकर हा या निवडणूकीचा मुद्दा नाही : शरद पवार

18 May 2024 12:39:42
 
MVA
 
मुंबई : वीर सावरकर हा या निवडणूकीचा मुद्दा नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एक आव्हान दिलं होतं. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. शनिवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
 
"राहुल गांधींनी आता निवडणूकीपुरतं वीर सावकरांबद्दल बोलणं आणि त्यांचा अपमान करणं बंद केलं आहे. काँग्रेस दिवसरात्र वीर सावरकरांचा अपमान करते. आज हे त्यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. आता राहुल गांधी कधीही वीर सावरकरांचा अपमान करणार नाही, असं त्यांच्याकडून वधवून घ्या," असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना दिले होते.
 
 हे वाचलंत का? - महाराष्ट्रात आज योगींच्या सभांचा झंजावात!
 
यावर शरद पवार म्हणाले की, "निवडणूकीच्या मुद्दांमध्ये वीर सावरकर हा विषय नाही. राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल कोणतंही भाष्य केलं नाही, असं म्हणणं म्हणजे काही कारण नसताना एकप्रकारे चिथावणी देण्याचं काम मोदी करत आहेत. त्यांचं भाषण हे जाणीवपूर्वक भाजपची धर्मांध प्रवृत्ती पुढे ठेवून वक्तव्य केलेलं आहे."
 
"आज सामाजिक ऐक्य हा विषय संपुर्ण देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे त्यांनी यासंदर्भात तारतम्य दाखवण्याची आवश्यकता आहे. पण, दुर्दैवाने हे पहिले प्रधानमंत्री आहेत जे याबाबत तारतम्य दाखवत नाहीत," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0