रामनाथ कोविंद सहपरिवार श्रीरामललाचरणी लीन

18 May 2024 14:51:02

Ramnath Kovind

मुंबई (प्रतिनिधी) :
भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind Ramlala) यांनी शनिवार, दि. १८ मे रोजी अयोध्या येथे श्रीरामललाचे सहपरिवार दर्शन घेतले. आपल्या कुटुंबीयांसह ते शुक्रवारी श्रीरामनगरी अयोध्येत पोहोचले. येथील एका जैन मंदिरात थोड्या विश्रांतीनंतर त्यांनी शरयू आरतीमध्ये सहभाग घेतला. शनिवारी सकाळी रामललाचे दर्शन घेतले तेव्हा श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे महामंत्री चंपत राय देखील उपस्थित होते. रामनाथ कोविंद यांनी कुबेर टिळा येथे जाऊन पक्षीराज जटायूचे दर्शन घेऊन महादेव मंदिरात पूजाही केली.




Powered By Sangraha 9.0