पुढील पंतप्रधान मोदीच कृपया असे विचारून…..

18 May 2024 15:11:57

Nitin Gadkari
 
 
मुंबई: 'मी पंतप्रधान होणार नाही पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील कृपया असे विचारून अडचणीत आणू नका असे हलक्याफुलक्या अंदाजात प्रश्नाचे उत्तर देत गडकरींनी यांनी हे स्पष्ट केले आहे. उपस्थिताने तुम्हाला पंतप्रधान पदी पहायचे आहे या प्रश्नाला उत्तर देताना हे विधान गडकरींनी केले आहे.आज बीडीबी (भारत डायमंड बोर्स) मुंबई येथे 'भारत तिसरी अर्थव्यवस्था के दहलीज पर' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताची अर्थव्यवस्था व डायमंड व्यापारी यांचे चर्चासत्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय राज्यमंत्री अर्थ भागवत कराड, भाजपाच्या महाराष्ट्राच्या विशेष संपर्क अभियान प्रमुख शायना एन सी, माजी आमदार आशिष देशमुख व हिरे व्यापारी यावेळी उपस्थित होते.
 
गेल्या १० वर्षात ज्या पद्धतीने भारतात विकास वेगाने झाला या मुद्यावर अनेक वक्त्यांनी यावेळी भर दिला होता. भारतातील विकासधोरण व विचारधारा याविषयी नितीन गडकरी यांनी विस्तृत भाष्य केले. यावेळी बोलताना, 'भारत स्वतंत्र झाल्यानंतर कम्युनिस्ट, समाजवादी विचारांचा पगडा होता आता तो जगभरातून नष्ट झाला.भारतीय जनता पक्षाने नेहमी लिबरल इकॉनॉमीचा विचार केला मात्र तो करत असताना नेहमी समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्यांचे कल्याण करणे हा विचार नेहमी ठेवल्याने आम्ही धोरणे राबवत आहोत. राजकारण व्यवसाय नसून मी 'पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिंशन्न ' करतो पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनिअंस नाही'. आतापर्यंत लाखो कोटीची कामे केली यापुढेही करणार' असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आहे.
 
भारतात विकास करत असताना आपल्याला आता तंत्रज्ञानाच्या मार्फत सौर ऊर्जा, इथेनॉल, हायड्रोजन अशा विविध पर्यायांचा विचार केला पाहिजे ज्यामुळे भारताच्या खर्चात कपात होतानाच मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढेल व इंधनाचा पर्याय मिळाल्यास इंधनासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. किंबहुना इथे यामुळे मोठी अर्थव्यवस्था उभी राहिल' असे नितीन गडकरी यांनी बोलताना म्हटले आहे.
 
रस्ते बनवताना कसा निधी उभारणार यावर त्यांनी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल हे उपयुक्त असल्याचा उल्लेख देखील केला होता. सगळ्यांना बरोबर घेत 'इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट' चा मार्ग आत्मसात केला पाहिजे 'असे देखील गडकरी यांनी म्हटले. अर्थव्यवस्थेतील मुद्यावर बोलताना गडकरी म्हणाले, 'भारतातील उत्पादन, सेवा क्षेत्रातील वाढीबरोबरच शेती क्षेत्रात पारंपरिक अन्न निर्मिती बरोबर उर्जा निर्मिती व इतर सह उद्योगाचा पर्याय आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीतून उत्पादन वाढल्यास अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागेल. प्रत्येक माणसाच्या हातात पैसा खेळण्यास तुमचा हिरा व्यापारींना पण विक्रीत फायदा होईल असे मिश्किलपणे गडकरी यांनी सांगितले.
 
याशिवाय या कार्यक्रमात उपस्थितांना उद्देशून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांतील कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. बँक खाते उघडण्यापासून सर्जिकल स्ट्राइकपर्यंत, कोविड काळात मोफत लस योजनेपासून पंतप्रधान आवास योजनेपर्यंत अनेक निर्णय घेतले. मोदींच्या काळात अर्थव्यवस्था १० व्या नंबरवरून ५ व्या क्रमांकावर आली. जगात भारताचे नाव झाले आहे भारताला 'विश्वगुरू' बनवण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा ' असे आवाहन कराड यांनी यावेळी केले आहे. याशिवाय इतर मान्यवरांच्या भाषणाने हा कार्यक्रम संपन्न झाला. मुंबईतील भाजपाचा संपर्क अभियानातील शेवटचा कार्यक्रम शनिवारी पार पडला.
Powered By Sangraha 9.0