२१७ दिवसांनंतर बाहेर आली ‘या’ घोरपडीची १८ पिल्लं...

18 May 2024 19:29:43




monitor lizard
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतुन साधारण वर्ष भरापुर्वी रेस्क्यू केलेल्या एका घोरपडीच्या १८ पिल्लांनी आता जन्म घेतला. बंद अधिवासातील यशस्वी पुनरूत्पादनाचं हे उदाहरण असून ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबईमध्ये एका घोरपडीचं बचाव कार्य करण्यात आलं होतं. या घोरपडीचे बचाव कार्य केल्यानंतर तिने सुमारे ४० अंडी दिली.

परंतू बचाव कार्य केलेले असल्यामूळे उपचारानंतर या घोरपडीला कायद्यन्वये पुन्हा मुक्त अधिवासात सोडणे गरजेचं होतं. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत पहिल्या क्षेणीमध्ये येणाऱ्या या घोरपडीला जीवदान देत तिला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले होते.



monitor lizard

मात्र, तिने दिलेल्या जवळजवळ ४० अंड्यांचे संरक्षण करण्यात आले. माती, कोको पिट आणि कोळशाचा थर यांच्या सहाय्याने ही अंडी कृत्रिमरित्या उबवण्यात आली. तब्बल २१७ दिवस उबवणीत असलेल्या या अंड्यांमधून आता १८ पिल्ले बाहेर आली असून इनक्यूबेशनचा हा प्रयोग यशस्वी ठरल्याचं लक्षात आलंय. आणखी काही अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडण्याची प्रतिक्षा आहे तर, त्यापैकी काही अंडी उष्णतेमूळे खराब झाली तसेच इतर काही कारणांनी पिल्ले जन्म घेऊ शकली नाहीत.

महाराष्ट्र वनविभागाने ऑक्टोबर २०२३ मध्ये बचाव कार्य केलेली ही घोरपड भारतीय वन्यजीव कायद्याच्या शेड्यूल १ अंतर्गत येणारी प्रजात आहे. त्यामूळेच संरक्षण आणि संवर्धनाच्या श्रेणीमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेल्या या घोरपडीच्या पिल्लांची दिर्घकालीन पुनरूत्पादन प्रक्रिया रॉ (RAWW) या संस्थेमूळे शक्य झाली आहे.

“दर चार दिवसांनी अंडी ठेवलेली त्या ठिकाणचं वातावरण, तापमान आणि आर्द्रता तपासत रहावी लागत होती. तसेच ती संतुलित ही ठेवावी लागत होती, २१७ दिवस हे ही अंडी ठेवणं सोपं नव्हतं. त्यात यंदा मोठी तापमानवाढ आहे, तरी हे पुनरुत्पादन यशस्वी ठरलं हे महत्त्वाचं वाटतं.”

- चिन्मय जोशी
जीवशास्त्रज्ञ, RAWW




Powered By Sangraha 9.0