उद्या शेअर बाजार चालू राहणार नुकसानभरपाईसाठी विशेष सत्र

17 May 2024 17:32:30

Stock Market
 
 
 
मुंबई: उद्या शनिवारी शेअर बाजाराचे विशेष सत्र होणार आहे. तशी घोषणा शेअर बाजार अथोरिटीने केली असून उद्या इक्विटी व इक्विटी गुंतवणूकीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हे विशेष आयोजन बाजारात केले गेले आहे. उद्या नेहमीप्रमाणे बीएसई व एनएसई बाजार चालू राहतील. गेल्या काही दिवसांत सण अथवा सार्वजनिक सुट्या, निवडणूका यामुळे शेअर बाजार अनेक दिवस बंद राहिल्याने नुकसान होते.
 
ते नुकसान भरून काढण्यासाठी शेअर बाजार चालू राहणार आहे. या सत्रादरम्यान प्राथमिक संकेतस्थळावरून 'Disaster Recovery Site' वर हे व्यापारी सत्र सुरु राहणार आहे. उद्या कॅश मार्केट सकाळी ८.४५ ते ९.०० वाजेपर्यंत चालू राहणार आहे. प्री ओपनिंग सत्र ९.०० ते ९.०८ पर्यंत चालू राहणार आहे व नेहमीप्रमाणे शेअर बाजार सत्र ९.१५ ला सुरू होऊन १० वाजेपर्यंत सुरू राहिल त्यानंतर विश्रांतीनंतर पुन्हा ११.१५ वाजेपासून पुन्हा बाजार सुरू होईल.
 
'Disaster Recovery Site' वर सकाळी प्रीओपनिंग सत्र ११.१५ ते ११.२३ पर्यंत असणार आहे. पारंपारिक बाजार ११.३० पासून १२.३० पर्यंत चालू राहील. बंद झाल्यानंतर सुधारणा (Modification) १ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. F & O बाजार ९.१५ लाख सुरू होऊन १० वाजेपर्यंत बंद होणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0