हिंदीपेक्षा कोरियन चित्रपट हजारो पटींनी चांगले - नसीरुद्दीन शाह

17 May 2024 18:13:08
Naseeruddin Shah 
 
 
मुंबई : अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी अलीकडेच हिंदी चित्रपटसृष्टीची तुलना कोरिअन चित्रपटांसोबत करत हिंदी चित्रपटांना फटकारले असून ते म्हणाले की बॉलिवूडमधील प्रेम कहाण्यांचा ते तिरस्कार करतात. आणि लवकरच हिंदी चित्रपटांचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे, कारण त्या एकाच ध्येयाने बनवल्या जात आहेत. आता नसीरुद्दीन यांच्या या वक्तव्यानंतर हिंदीतून कुणाची काही प्रतिक्रिया येते का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
 
नसीरुद्दीन यांनी हिंदी चित्रपटांवर आगपाखड करत अत्यंत तिखट शब्दांत एका उर्दू फिल्म फेस्टिवलमध्ये म्हटले की, “तुम्ही कोरियन चित्रपट पाहा, तुम्ही थायलंडमधील चित्रपट पाहा... आपल्या चित्रपटांपेक्षा ते हजारो पटींनी चांगले आहेत आणि आपण छाती ठोकून सांगतो की बॉलिवूडचे चित्रपट जगभर बघितले जातात. सर्वप्रथम, मला या बॉलिवूड लव्हबद्दल खूप तिरस्कार आहे”.
पुढे ते म्हणाले की, 'ज्याप्रकारे जगभरात भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला जातो, त्याप्रकारे आपले चित्रपटही जगभरात पाहिले जातात. मात्र भारतीय खाण्यात काहीतरी दम आहे, त्यामुळे ते खाल्ले जातेय.' हिंदी चित्रपटाच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल याबद्दल ते म्हणाले की, 'हिंदी चित्रपटाचे बबल लवकरच फुटणार आहे, मला याबद्दल खात्रीच आहे, कारण त्यात काही सार नाही आहे. हे चित्रपट एकाच उद्देशाने बनवते जातात आणि हा उद्देश सर्वांना माहीत आहे.
Powered By Sangraha 9.0