कर भरत असाल तर ही बातमी वाचाच !

15 May 2024 15:26:09

tax
 
 
मुंबई: टॅक्स फायलिंग सिस्टीम अधिक पारदर्शक व्हावी यासाठी Central Board of Direct Taxes (सीबीडीटी) नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता Annual Information System AIS या प्रणालीत नव्या सुविधेची भर सीबीडीटीने केली आहे. यामध्ये आता करदाता झालेल्या व्यवहारांवर आपला अभिप्राय (Feedback) नियामक मंडळाला सांगू शकतील. रियल टाइम बेसिसवर ही कार्यपद्धती शक्य झाल्याने करदाता आणि टॅक्स अधोरिटी यांच्यातील संवाद सुलभ होणार आहे.
 
कुठलाही व्यवहार झाल्यावर त्यावर करदात्यांना आपली प्रतिक्रिया नोंदवता येणार आहे. याविषयी वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, 'आता अभिप्राय देणे तसेच करदात्यांना प्रदान केलेल्या माहितीच्या अचूकतेवर टिप्पणी करणे करदात्यांना मदत करेल.बँका, नोंदणी कार्यालये, क्रेडिट कार्ड,आणि किरकोळ व्यवहार यासह अनेक माहिती स्त्रोतांंकडून प्राप्त झालेल्या आर्थिक डेटा आधारे AIS भरलेले आहे.
 
यापूर्वी काही करदात्यांनी प्रदान केलेली माहिती अचूक नव्हती . माहिती दुरूस्त करण्यासाठी पर्याय असला तरी नवीन सुविधेमुळे कंपलायंस सुरळीत होण्यासाठी मदत होईल व करदात्यांना चांगला अनुभव मिळू शकतो.'
 
Powered By Sangraha 9.0