मोठी बातमी! घाटकोपर दुर्घटनेतील होर्डिंगखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती

15 May 2024 13:33:55
 
Hoarding
 
मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप बचावकार्य सुरुच आहे. दरम्यान, या होर्डिंगखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
सोमवार ५ मे रोजी आलेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, दोन दिवसांनंतरही याठिकाणी बचावकार्य सुरुच आहे. होर्डिंगच्या खाली आणखी काही लोकं अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  "ते युवानेते, त्यांना आताच कशाला...;" उपमुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना टोला
 
भावेश भिंडे याच्या 'इगो मिडीया प्रायव्हेट लिमिडेट' कंपनीचे हे होर्डिंग आहे. या दुर्घटनेनंतर भावेश भिंडे फरार झाला असून मुंबई पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. हे होर्डिंग बेकायदेशीर असून भावेश भिंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, होर्डिंगच्या खाली अजूनही काहीजण अडकल्याची माहिती पुढे आल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर अनेक शहरांतील महानगरपालिका सतर्क झाल्या असून बेकायदा होर्डिंग हटवण्यात येत आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0