महत्त्वाची बातमी! शिक्षक आणि पदवीधर निवडणूक पुढे ढकलली

14 May 2024 16:23:03
 
Vidhan Parishad
 
मुंबई : विधानपरिषदेची शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. शाळांच्या उन्हाळी सुट्या सुरु असल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप निवडणूकीच्या पुढील तारखेबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
 
येत्या १० जून रोजी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ या चार मतदारसंघांचा यात समावेश होता. परंतू, आता ही निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. शाळेच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर निवडणूक घ्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. दरम्यान, याची दखल घेत निवडणूक आयोगाने एक पत्रक जारी करत निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0