सोनार समाजाचा निरंजन डावखरेंना पाठिंबा! ओरोस येथे घेतली सदिच्छा भेट

14 May 2024 11:35:00

Niranjan Davkhare 
 
मुंबई : ओरोस येथे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची सोनार समाजाच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी मुंबई डिस्ट्रिक हाऊसिंग फेडरेशनचे तज्ञ संचालक आणि दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख विशाल कडणे यांच्यासोबत गणेश तळगावकर, चिंतामणी कल्याणकर, संकेत महाडिक आणि भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
 
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये सोनार समाजाचे मोठे वर्चस्व असून समाजाचे युवाप्रमुख विशाल कडणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील २५०० हुन अधिक पदवीधर मतदारांनी १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे. या शिष्टमंडळ भेटीदरम्यान १० जून रोजी होणाऱ्या कोकण पदवीधर निवडणुकीसाठी सोनार समाजाने निरंजन डावखरे यांना पाठींबा जाहीर केला. तसेच निवडणुकीत निरंजन डावखरे यांना निवडून आणण्याचा निश्चय जाहीर केला. कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना ही सदिच्छा भेट घेण्यात आली आहे. यावेळी कोकणातील रोजगार, स्वयंरोजगार, पदवीधरांचे विविध प्रश्न इत्यादी विषयावर सखोल चर्चा झाली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0