होर्डिंग कंपनीचा मालक फरार!

14 May 2024 17:19:09
 
Hoarding
 
मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिडे फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्याचा तपास घेण्यात येत असून हे होर्डिंग बेकायदेशीरपणे लावल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी आता अनेक नवनवीन बाबी पुढे येत आहेत.
 
सोमवार ५ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले. 'इगो मिडीया प्रायव्हेट लिमिडेट' कंपनीला या होर्डिंगचे कंत्राट देण्यात आले असून भावेश भिडे हा या कंपनीचा मालक आहे.
 
हे वाचलंत का? -  महत्त्वाची बातमी! शिक्षक आणि पदवीधर निवडणूक पुढे ढकलली
 
याशिवाय हे होर्डिंग अनधिकृतपणे बांधले गेल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, भावेश भिडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू, भावेश भिडे सध्या फरार झाला आहे. मुंबई पोलिस भावेश भिडेच्या घरी दाखल झाले असता तो घरी नसल्याचे त्यांना आढळून आले. याशिवाय भावेश भिडेचा मोबाईलही बंद येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0