Q4 Results: झोमॅटो तिमाही निकाल जाहीर कंपनीला १७५ कोटींचा निव्वळ नफा या तिमाहीत २६.८ टक्क्यांनी नफ्यात वाढ

13 May 2024 19:09:20

Zomato
 
 
 
मुंबई: झोमॅटो कंपनीने आज आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीला ३१ मार्च २०२४ पर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर १७५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. सलग चौथ्यांदा कंपनीच्या नफ्यात यंदा वाढ झाली आहे.मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला १८७ कोटींचा तोटा झाला होता. तिसऱ्या तिमाहीतील १३८ कोटींच्या तुलनेत हा नफा २६.८ टक्क्यांनी वाढला आहे.
 
कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue From Operations) मध्ये ३५६२ कोटीवर पोहोचले मागील वर्षी हे उत्पन्न २०५६ कोटी होते.तज्ञांच्या अंदाजापेक्षा मार्जिन घटले असले तरी इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीला ७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात कंपनीला २७ टक्क्यांने वाढत १३८ कोटींवर नफा गेला होता. तिमाहीत बेसिसवर (QoQ) ८.३ टक्क्यांनी नफा वाढला आहे.
 
झोमॅटो कंपनीच्या एकूण महसूलात मागील वर्षाच्या ११७२ कोटींचा तुलनेत १७३९ कोटींचा नफा झाला आहे. मागील संपूर्ण वर्षातील ४५३३ कोटींच्या तुलनेत महसूलात वाढ होऊन ६३५१ कोटींवर महसूल संख्या पोहोचली आहे. याशिवाय कंपनीचा क्विक कॉमर्स सेवा पुरवणारे 'ब्लिंकिट' चे महसूल ७६९ कोटींवर पोहोचले आहे. मागील वर्षी कंपनीला ३६३ कोटींचा नफा झाला होता.
 
झोमॅटो कंपनीच्या ईबीआयटीडीएमध्ये (कर व इतर खर्च पूर्व नफा) ८६ कोटीवर पोहोचला आहे. मागील वर्षी ईबीआयटीडीए मार्जिनमध्ये कंपनीला २२६ कोटींचे नुकसान होते यंदा मात्र कंपनीला नफा झाला आहेगेल्या काही तिमाहींमध्ये नमूद केल्या प्रमाणे, द्रुत वाणिज्यचे एकूण ऑर्डर मूल्य चौथ्या तिमाहीतही चांगली कामगिरी करत आहे.ब्लिंकिटचे एकूण ऑर्डर मूल्य ४०२७ कोटी वर्षानुवर्षे ९७ टक्के आणि तिमाही दर तिमाहीत १४ टक्क्यांनी वाढले.तर,अन्न वितरण व्यवसायाचे ८४३९ कोटी रुपयांचे एकूण ऑर्डर मूल्य वर्षानुवर्षे २८ टक्क्यांनी वाढले आणि अनुक्रमे ०.६ टक्क्यांनी किरकोळ कमी झाले.
 
आलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना ,झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपंदर गोयल म्हणाले की त्यांनी घेतलेली पैज यशस्वी झाली याबद्दल मी कृतज्ञ आहे. आम्ही नेहमीच एक व्यवसाय सुरू केला आहे ज्याचे संरक्षण किंवा वाढ करण्यासाठी आमच्याकडे आधीपासून ध्येय आहे, एकच ध्येय - टिकून राहा. आम्ही ब्लिंकिट विकत घेतले तेव्हाही,आम्ही हे स्पष्ट केले की व्यवसाय संपादन करण्याचे मुख्य कारण म्हणजे अन्न वितरण व्यवसायाचे रक्षण करणे कारण एक चांगला झोकून देणारा क्विक कॉमर्स खेळाडू दीर्घकाळात अन्न वितरण व्यवसायासाठी सहज धोका निर्माण करू शकतो.'
 
Powered By Sangraha 9.0