उद्या निर्मला सीतारामन यांचा मुंबई दौरा !' विकसित भारत २०४७' या कार्यक्रमात भारताची रुपरेषा स्पष्ट करणार

13 May 2024 18:27:00

Nirmala Sitharaman
 
 
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात महत्वाचे आर्थिक निर्णय घेण्यात आले होते.आर्थिक सुधारणा करतानाच मोदी सरकारने  'विकसित भारत २०४७' हे लक्ष उराशी बाळगत आपला १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.याविषयी मुंबईत दिनांक १४ मे रोजी बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेंशन सभागृहात ' विकसित भारत २०४७' हा कार्यक्रम होणार असुन या कार्यक्रमाला देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
 
दुपारी ३.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निर्मला सीतारामन यांच्या व्यतिरिक्त भाजपाच्या विशेष संपर्क प्रमुख शायना एन सी व मुंबई भाजपाचे जनरल सेक्रेटरी संजय उपाध्याय यांची उपस्थिती कार्यक्रमात असणार आहे.
 
गेल्या १० वर्षात घेतलेले धाडसी निर्णय व पूर्णत्वास नेलेले प्रकल्प याशिवाय प्रलंबित विकासाचे स्वप्न व २०४७ भारताला विकसनशील अवस्थेतून संपूर्ण विकसित भारत या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी घेतलेला पुढाकार अशी बहुआयामी चर्चा या कार्यक्रमात होण्याची शक्यता आहे.
 
मोदी सरकारच्या काळात भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला असताना आगामी काळात भारत क्रमांक ३ ची अर्थव्यवस्था बनणे अपेक्षित आहे. देशाच्या अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आगामी भारताची अर्थव्यवस्था कशी बहरेल याविषयी स्वतः निर्मला सीतारामन या प्रमुख मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमात जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे निर्मला सीतारामन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय विधान करतात व आगामी सरकारचे १०० दिवस कसे असतील याकडे सगळ्यांचे आतुरतेने लक्ष लागलेले .
 
Powered By Sangraha 9.0