कै.भालचंद्रशास्त्री मुळे व मधुरभट्ट जोशी 'महर्षि पुरस्कार २०२४'चे मानकरी

13 May 2024 15:08:06

Maharshi Puraskar 2024

मुंबई (प्रतिनिधी) :
अद्वैत सिद्धांताचे जनक जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त वर्ष २०२४ चा 'महर्षि पुरस्कार' (Maharshi Puraskar) महामहोपाध्याय, धर्मसम्राट वेदशास्त्रसंपन्न कै.भालचंद्रशास्त्री मुळे, त्र्यंबकेश्वर व वैदिकसम्राट, महापंडित, घनपाठी मधुरभट्ट जोशी यांना प्रदान करण्यात आला. कै.भालचंद्रशास्त्री मुळे यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला असून त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव पंडित श्रीकांतशास्त्री मुळे गुरूजी यांनी हा पुरस्कार स्विकारला.

हे वाचलंत का? : राम मंदिराचे शुद्धीकरण करू पाहणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा! : गोविंददेव गिरी महाराज
 
धर्म, शास्त्र व भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या ज्ञानपरंपरा व कर्मयोगाद्वारे समाज कल्याणासाठी विशेष योगदान दिले अशांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज, वेदमूर्ती नागेशशास्त्री देशपांडे गुरूजी, व्याकरणाचार्य यतीशचंद्र मिश्र, केंद्रीय विद्यालय, भारत सरकार, साहित्याचार्य बिनोदकुमार चौधरी, संस्कृत विश्वविद्यालय, न्यायमूर्ती वसंत पाटील सर तसेच समाजातील अनेक मान्यवर, धर्मपंडित व भक्त परिवार मोठ्या संख्येत उपस्थित होता. महर्षि पंचायतन सिद्धपीठम, नाशिक येथे सरद कार्यक्रम संपन्न झाला.

Powered By Sangraha 9.0