"सुपारीबहाद्दर लोकांनी राजकारणावर बोलू नये!"

12 May 2024 13:56:37

Sanjay Raut 
 
मुंबई : सुपारीबहाद्दर लोकांनी राजकारणावर बोलू नये, असा घणाघात शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर केला आहे. यावेळी त्यांनी राऊतांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरही निशाणा साधला. ते रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, "संजय राऊत कुणीची तुलना कुणाशीही करत आहेत. एखाद्या दलालांच्या तोंडी अशी वाक्य शोभत नाहीत. सुपारीबहाद्दर लोकांनी राजकारणावर बोलू नये. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांना असलेलं स्थान तुमच्यासारख्या बिनडोक माणसाला कळणार नाही. पक्षाची इज्जत वाढवणाऱ्या माणसांविषयी इज्जत घालवणाऱ्या माणसाने बोलणं म्हणजे मुर्खाच्या नंदनवनात वावरण्यासारखं आहे," असा टोला त्यांनी लगावला.
 
हे वाचलंत का? -  "हिंदू समाज उद्धव ठाकरेमुक्त करणार!"
 
ते पुढे म्हणाले की, संजय राऊतांनी चुकून हे तरी मान्य केलं की, शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना सांभाळतात आणि त्यांना मदत देतात. मग देतो टेम्पो भरून पैसे असो किंवा साहित्य असो. एकनाथ शिंदे साहेबांची देण्याची भूमिका आहे हे राऊतांनी मान्य केलं आहे. संजय राऊत प्रत्येक मतदारसंघात जाऊन वसूली करुन मातोश्रीमध्ये पेट्या घेऊन जात आहेत, हे प्रत्येक उमेदवार मान्य करेल. त्यामुळे तुम्ही इनकमिंगवाले आहात आणि आम्ही आऊटगोईंगवाले आहोत. तुम्ही कार्यकर्त्याला मदत करण्याऐवजी त्याचं खच्चीकरण करण्याचं काम करत आहात."
 
उद्धव ठाकरेंनी चुका मान्य करायला हव्या होत्या!
 
"उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत आपल्या चुका मान्य करायला हव्या होत्या. तुमची मुलाखत घेणाऱ्याला तुम्ही कसे मोठे आहेत हे दाखवणं गरजेचं होतं. परंतू, तुमची भूमिका सत्याची असायला हवी होती. तुम्ही तुमच्या काही चुका मान्य केल्या असत्या तर महाराष्ट्राच्या जनतेने कमीत कमी तुम्ही चुका मान्य केल्या असं मानलं असतं," असेही संजय शिरसाट म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0