"१९९९ मध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

12 May 2024 16:58:02

Thackeray & Fadanvis
 
मुंबई : उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सकाळ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी अनेक खुलासे करत विविध विषयांवर भाष्य केलं.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव पुढे येत नसल्याने त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष केले होते. तसेच नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत याबाबतची काळजीही त्यांनी घेतली. उद्धव ठाकरेंना जनहितापेक्षा पद महत्त्वाचे वाटत होते. ते काँग्रेससोबत जातील असं कधीच वाटलं नव्हतं," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? - आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत : संजय राऊत
 
ते पुढे म्हणाले की, "अजित पवार आरोपांमुळे आमच्यासोबत आले नाहीत. त्यांच्यावर दोषसिद्ध झालेले नाहीत. तर ते मोदीजींच्या विकासकामांना पाठिंबा देण्यासाठी आमच्यासोबत आले. पण अजितदादांच्या कुटुंबाने बारामतीच्या लढाईत त्यांना एकटं पाडलं. ते अभिमन्यूसारखे एकटे लढलेत."
 
लोकसभा निवडणूकीत मनसेने महायूतीला पाठिंबा दिला. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "आम्ही तीन पक्ष एकत्र असल्याने आणि केवळ ४८ जागा असल्यामुळे राज ठाकरेंना लोकसभेत जागा देऊ शकलो नाही. पण विधानसभेत नक्की त्यांचा विचार करु," असे ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0