कवच प्रणालीसाठी धोरणात्मक भागीदारी

11 May 2024 17:46:41

railway


मुंबई, दि.१० :  
रेलटेलने क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडसोबत ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम (कवच) प्रणालीच्या अंमलबजावणी प्रकल्पांसाठी परदेशात भारतीय रेल्वेसाठी विशिष्ट संधींचा शोध आणि वितरीत करण्यासाठी धोरणात्मक सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मिनी रत्न सीपीएसइ, रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गतने भारतीय रेल्वे आणि परदेशात रेल्वेसाठी कवच (ट्रेन कोलिशन अवॉयडन्स सिस्टीम) अंमलबजावणी प्रकल्पांचा शोध आणि वितरण करण्यासाठी क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडसह सामंजस्य करार केला आहे. सामंजस्य करार कवच संबंधित नवा आराखडा तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावेल.
सामंजस्य कराराचे उद्दिष्ट

या सामंजस्य करारावर १ मे २०२४रोजी रेलटेल कॉर्पोरेट कार्यालय, नवी दिल्ली येथे स्वाक्षरी करण्यात आली. क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड कवच प्रकल्पासाठी आरडीएसओद्वारे मूळ उपकरण निर्माता म्हणून अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. रेलटेलकडे रेल्वे सिग्नलिंग सिस्टीममधील तज्ञांची एक इन-हाउस टीम आहे आणि कवच सारखे मोठे अपग्रेड प्रकल्प हाती घेण्यास ती पूर्णपणे सक्षम आहे. दोन्ही पक्ष त्यांच्या वैयक्तिक कौशल्यासह एकत्रितपणे आणि आक्रमकपणे कवच प्रकल्पाच्या संधी शोधतील.

कवच म्हणजे काय

कवच ही भारतीय रेल्वेने स्वदेशी विकसित केलेली स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. ही एक उच्च तंत्रज्ञान-केंद्रित प्रणाली आहे, ज्यासाठी सर्वोच्च ऑर्डरचे सुरक्षा प्रमाणपत्र आवश्यक आहे. जुलै २०२०मध्ये रेल्वे मंत्रालयाने ही राष्ट्रीय ATP प्रणाली म्हणून स्वीकारली. भारतीय रेल्वे नेटवर्कवर कवचची अंमलबजावणी हे भारतीय रेल्वेच्या प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे.
Powered By Sangraha 9.0