पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट!

11 May 2024 18:15:39
West Bengal Bomb blast at bjp leader house

नवी दिल्ली
: लोकसभा निवडणुकीचा २०२४ चा तिसरा टप्पा पार पडला आहे. याशिवाय निवडणुकीचे ४ टप्पे बाकी आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर येथील भाजप नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट झाल्याची माहिती काही वृत्तसंस्थानी दिली आहे. भाजपच्या या नेत्याकडे पक्षाचे पंचायत प्रमुख पद आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी सहा बॉम्ब पेरण्यात आले होते. यातील २ बॉम्बचे स्फोट झाले. दि. १० मे २०२४ रोजी मध्यरात्री ४ सक्रीय बॉम्ब जप्त करण्यात आले आणि ते निकामी करण्यात यश आले आहे.

ही घटना खेजुरी २ ब्लॉक अंतर्गत हलुदबारी गावात घडली. भाजपच्या पंचायत प्रमुख निताताई मंडल यांनी त्यांच्या घरात मोटारसायकल ठेवली होती, जिचे या बॉम्बस्फोटात नुकसान झाले. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच खेजुरी पोलिस ठाण्याचे पथक मध्यरात्री घटनास्थळी पोहोचले. बॉम्बस्फोट झालेल्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून तपास सुरू केला आहे. हे कोणी केले याबाबत काहीही समोर आलेले नाही.

पोलिसांनी ४ गोलाकार बॉम्ब जप्त केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. भाजप नेत्याने सांगितले की, रात्री सव्वा ते १ च्या सुमारास त्यांना टेरेसवरून काही आवाज ऐकू आला. तेवढ्यात त्यांना जाग आली, त्यांना काही लोकांचे आवाजही ऐकू आले. भाजप नेत्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, जेव्हा ते बाहेर पडले नाहीत तेव्हा कोणीतरी त्यांची बाईक आणि कार पेटवली. हे कोणी केले हे मला माहीत नाही, पण नावाचा अंदाज लावू शकतो, असे भाजप नेत्याने सांगितले.



 
Powered By Sangraha 9.0