हृतिक रोशनने केली अ‍ॅपलच्या ‘त्या’ जाहिरातीवर टीका; अभिनेता म्हणाला…

11 May 2024 16:17:54

rosshan  
 
 
मुंबई : अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) क्वचित पण नेमकं मत कोणत्याही विषयांवर मांडत असतो. सध्या चर्चेत असलेल्या अ‍ॅपल कंपनीच्या आयपॅडच्या एका जाहिरातीवर त्याने टीका केली आहे. त्याच्या या विशेष पोस्टने प्रेक्षकांचं (Hrithik Roshan) लक्ष वेधून घेतलं आहे.
 
हृतिक रोशननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. अ‍ॅपलच्या ‘आयपॅड प्रो २०२४’ (iPad Pro 2024)च्या जाहिरातीवर त्याने टीका करत नवीन अ‍ॅपलची जाहिरात किती दुःखी आणि अज्ञानी आहे, असे लिहिले आहे.
 
 

rosshan  
 
अ‍ॅपल कंपनीचे सीईओ टिम कूक यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन ‘आयपॅड प्रो २०२४’ची जाहिरात शेअर केली होती. तेव्हापासून या जाहिरातीवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. यात हॉलीवूड अभिनेता ह्यू ग्रँट, लेखक व निर्माता आसिफ कपाडिया, चित्रपट निर्माते व अभिनेता जस्टिन बेटमन यांच्यासह अनेकांनी टीका केली आहे.
 
सीईओ टिम कूकनी लिहिले आहे की, “हा आम्ही तयार केलेले सर्वांत पातळ प्रॉडक्ट आहे. एम ४ चिपच्या अविश्वसनीय सामर्थ्यानं आम्ही आतापर्यंत उत्पादित केलेला सर्वांत प्रगत डिस्प्ले या प्रॉडक्टमध्ये आहे. फक्त कल्पना करा की, हे प्रॉडक्ट अजून किती गोष्टी तयार करू शकतं.”
 
 
 
 
‘ॲड एज’ने दिलेल्या वृत्तानुसार, ॲपलने या जाहिरातीबद्दल माफी मागितली आहे त्यांनी एक निवेदन देखील जाहिर केलं होतं. “आमच्या डीएनएमध्ये क्रिएटिव्हीटी आहे. जगभरातील क्रिएटिव्हजना सक्षम करणारे प्रॉडक्ट्स डिझाइन करणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वापरकर्त्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी असंख्य मार्ग असले पाहिजेत आणि आयपॅडद्वारे त्यांच्या या मार्गांना, कल्पनांना आम्ही सत्यात उतरवू पाहतो. ते आमचं नेहमीच ध्येय राहिलं आहे. या व्हिडीओमुळे आम्ही जे दाखविण्याचा प्रयत्न करीत होतो, त्याचा मार्ग चुकला आणि त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.”
Powered By Sangraha 9.0