मुंबई (प्रतिनिधी) : “आतापर्यंत काँग्रेस पक्ष फक्त राम मंदिरालाच विरोध करत असे, पण आता काँग्रेस पक्ष आदिवासी आणि दलित समाजाचाही अपमान करू लागला आहे, हे दुर्दैव आहे,” असे म्हणत हनुमानगढीचे मंदिर पुजारी (Hanumangadhi Pujari ) महंत राजू दास यांनी पटोलेंच्या विधानावर उत्तर दिले आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अयोध्येतील राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्या दौऱ्यादरम्यान रामललाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर पटोलेंनी केलेल्या विधानामुळे राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही राजकीय वादळ निर्माण झाल्याचे दिसते आहे.
#WATCH | Uttar Pradesh: On Maharashtra Congress president Nana Patole's statement regarding Ram Temple, Hanuman Garhi temple priest Mahant Raju Das says, "Till now the Congress party used to oppose only the Ram temple, but it is unfortunate that now the Congress party has started… pic.twitter.com/71gTpOu95K
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना महंत राजू दास म्हणाले की, त्यांचे वक्तव्य दुर्दैवी असून असे वक्तव्य करून दलित समाजाचा अपमान करणे भारतासाठी अत्यंत धोकादायक आहे. काँग्रेस पक्ष ज्याप्रकारे आदिवासी, दलित आणि मागासलेल्या लोकांचा अपमान करत आहे, त्याचे उत्तर जनता नक्कीच मागेल.'