अक्षय तृतीया संपताच सोन्याचांदीत मोठी घसरण

11 May 2024 19:24:17
 
Gold
 
 
मुंबई: सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.स्थिर रुपया, तसेच पुरवठ्यातील नियमितता व बाजारातील स्थैर्य यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०१ टक्क्यांनी घसरण होत सोने ७२७२२.०० पातळीवर पोहोचले आहे.
 
'गुड रिटर्न्स' या संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील सराफा बाजारात सरासरी सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ३०० ते ३३० रुपयांनी घट झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ३०० रुपयांनी वाढ होत सोने ६७२५० रुपयांवर पोहोचले आहे तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ३३० रुपयांनी वाढत सोने ७३३६० रुपयांवर पोहोचले आहे.
 
मुंबईत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम दरात ३०० ते ३३० रुपयांनी घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचे दर ६७२५० वर पोहोचले आहेत तर २४ कॅरेट सोन्याच्या दर ७३३६० रुपयांवर पोहोचले आहेत.

चांदीच्या किंमतीतही घसरण -
भारतातील व मुंबईतील चांदीच्या दरातही घसरण होत भारतातील चांदीच्या एक किलो दरात ७०० रुपयांनी घसरण झाली आहे. मागील १० मे लाख चांदीच्या दरात २५०० रुपयांनी वाढ झाली आहे जी आज ७०० रुपयांनी किंमत घटली आहे. आज चांदीचे दर प्रति किलो ८७००० रुपये आहे.
 
Powered By Sangraha 9.0