बुलेट ट्रेन प्रकल्पाची पालघरमधील कामे सुसाट

11 May 2024 17:52:22

bullet


मुंबई, दि.१०: विशेष प्रतिनिधी 
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात शंभर ओपन फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे, बोईसर आणि विरार बुलेट ट्रेन स्थानकांवर प्रगतीपथावर, नदीवरील पूल आणि डोंगरावरील बोगद्यांची तयारी सुरू असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांच्या महाराष्ट्रातील कामांना गती आहे. अशातच पॅकेज सी ३ अंतर्गत महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू झाले असल्याची माहिती एनएचआरसीएलने दिली आहे.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांची दोन्ही राज्यातील कामे प्रगतीपथावर आहेत. या कॉरिडॉरच्या महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील शिळफाटा आणि झरोली गावादरम्यान मुख्य मार्गाची एकूण लांबी १३५.४५ किमी आहे. यामध्ये १२४.०२७ किलोमीटरच्या मार्ग आणि पुलांचा समावेश आहे.

ठाणे पालघरमध्ये ठाणे, विरार आणि बोईसर या तीन स्थानकांचा समावेश आहे. या मार्गात उल्हास नदी, वैतरणा आणि जगणी या तीन नद्यांचा समावेश आहे. वैतरणा नदी, विरार आणि बोईसर बुलेट ट्रेन स्टेशन सारख्या प्रमुख स्थानासह संपूर्ण १३५ किमीसाठी भू-तांत्रिक तपासणी पूर्णत्वास आली आहे. तसेच या प्रदेशात दोन पर्वतीय बोगद्यांचे कामही सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी पिअर फाउंडेशनचे काम सुरू झाले आहे. यासोबतच, पूर्ण स्पॅन आणि गर्डरच्या सेगमेंट कास्टिंगसाठी कास्टिंग यार्ड विकसित केले जात आहेत.
Powered By Sangraha 9.0