मोठी बातमी अपडेट : रिलायन्स कॅपिटलचा अधिग्रहणाला आयआरडीएआयची मान्यता

11 May 2024 18:13:03

Reliance Capital
 
 
मुंबई: इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने बहुप्रतिक्षित रिलायन्स कॅपिटल इन्शुरन्सचे इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IIHL) व सहयोगी कंपनीकडून अधिग्रहण करण्यास मान्यता दिली आहे.
 
मॉरिशस स्थित कंपनी आयआयएचएलने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,'अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आयआरडीएआयने मान्यता दिली आहे 'असे म्हटले आहे. याविषयी अधिक बोलताना,आयआरडीएआयच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, 'मंजुरी काही  नियामक, वैधानिक,आणि न्यायिक ' पालकांच्या अधिन आहे. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड शक्य त्या तितक्या लवकर ते काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत व एनसीएलटीच्या (नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल ) ने २७ मे २०२४ पर्यंत हा व्यवहार बंद करण्याचे म्हटले होते.'
 
'आम्ही ही संधी घेत असताना सगळ्या स्टेकहोल्डर, नियामक मंडळ, प्रशासक यांचे वेळेवर दिलेल्या पाठिंब्यामुळे आभार मानतो.' असे म्हटले आहे. या कंपनीने आधी रिलायन्स कॅपिटल संचाची पुनर्रचना केली होती ज्यामध्ये Cyqure India, Ecopolis, Cyqurex Technologies, व IIHL BFSI होल्डिंग्स या नवीन संस्थांचा परिचय करुन दिला होता.'आता नव्या आस्थापनेमुळे समुहाला ७४ टक्क्यांपर्यंत परदेशी गुंतवणूक विमा उद्योगात आणणे शक्य होणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0