नकली बनून का फिरता, शिंदे-दादांसोबत या पवारांना मोदींची खुली ऑफर

10 May 2024 13:28:47

Sharad Pawar 
 


नंदुरबार : शिंदे आणि अजितदादांसोबत या सर्व स्वप्न पूर्ण होतील, अशी जाहीर ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. नंदुरबारच्या सभेत हिना गावित यांच्या प्रचारसभेला मोदींनी हे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याचा दाखल देत त्यांनी ही ऑफर दिली. छोट्या छोट्या राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा मुद्दा काढत त्यांनी शरद पवारांना खुली ऑफर देऊ केली आहे.
 
नरेंद्र मोदी म्हणाले, "छोट्या छोट्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसमध्ये विलीनकरण्याची भाषा विरोधक करत आहेत. नकली शिवसेना आणि नकली एनसीपी हे दोघेही काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार केला आहे. ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे अजितदादा आणि शिंदेंसोबत या तुमची स्वप्ने मोठ्या शानशौकात पूर्ण होतील.", अशा स्वरुपाचं आवाहन नरेंद्र मोदींनी खुल्या मंचावरुन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. याचा मोठा धक्का काँग्रेसने घेतला आहे.
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. नकली शिवसेनेचे काही लोकं मला जीवंत गाडण्याची भाषा करत आहेत. तर काँग्रेसने "मोदी तेरी कब्र खुदेगी", असं मला विचारतात. यावरुनच नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन त्यांनी निशाणा साधला. मला शिवीगाळ करतानाही ते त्यांच्या मतदारांना खूश करण्यासाठी तुष्टीकरणाची काळजी घेतात. त्यांच्या भाषणांमध्येही हे दिसून येते," असेही ते म्हणाले.
 
काय म्हणाले शरद पवार?
 
शरद पवार यांनी याबद्दल प्रतिक्रिया देत म्हटले की, "आमची विचारधारा ही गांधी-नेहरूंची आहे. मोदींमुळे संसदीय लोकशाही संकटात आली आहे. देशाचे हित नाही तिथे माझे सहकारी नाहीत. माझं व्यक्तिगत मत आहे की व्यक्तीगत संबंध हे वेगळे आणि धोरणातील संबंध वेगळे. जे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली. यात केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही.", असे शरद पवार म्हणाले.
 
मोदींनी शरद पवारांच्या मुलाखतीचा संदर्भ दिला त्याबद्दल शरद पवार म्हणाले की, "गांधी नेहरूंची विचारधारा आमची आहे. मोदींनी मुस्लीम समाजाचा वेगळा विचार केला. देश जर एकसंध ठेवायचा असेल तर हिंदू मुस्लीम आणि ख्रिश्चन आणि जैन या सर्वच धर्मीयांना सोबत घेऊन जाणारा हवा. मोदींची भाषणे एका समाजाचे समर्थन करणारे आहे, हे देशाच्या हिताचे नाही.", अशी टीका शरद पवारांनी केली.
 
 
Powered By Sangraha 9.0