शेअर बाजार अपडेट: तीन दिवसानंतर मार्केट ' बुल' सेन्सेक्स १४९.०६ अंशाने वाढत ७२५५३.२३ पातळीवर व निफ्टी ६९.०५ अंशाने वाढत २२०२६.५५ पातळीवर

10 May 2024 11:24:45

Stock Market
 
 
मुंबई: अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज तीन दिवसांच्या घसरणीनंतर वाढ झाली आहे. बाजारातील सेल प्रेशर वातावरणामुळे बाजारात निर्देशांकात घट झाली.आज मात्र सेन्सेक्स १४९.०६ अंशाने वाढत ७२५५३.२३ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ६९.०५ अंशाने वाढत २२०२६.५५ पातळीवर पोहोचला आहे. आज काही लार्जकॅप निर्देशांकात वाढ झाल्याने बाजारात चढत्या आलेखाची सुरूवात झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात १४७.३४ अंशाने वाढत ५४३८८.२७ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक १७७.६५ अंशाने वाढत ४७६६५.५५ पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसईत मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.३३ व ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४४ व ०.४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी रियल्टी (०.६१%) व आयटी (०.७५ %) समभागात घसरण झाली आहे. बाकी सगळ्या क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली. विशेषतः सर्वाधिक वाढ फार्मा (१.११%) मेटल (१.०२%) हेल्थकेअर (०.९८%) कनज्यूमर ड्युरेबल्स (०.७५%) समभागात झाला आहे.
 
सकाळच्या सत्रात बाजारात युटर्न मारला असला तरीदेखील आजच्या तिमाही निकालावर व अमेरिकन व्याजदर कपातीचा भविष्यातील अंदाज, काल बँक ऑफ इंग्लंडने व्याजदर स्थिर ठेवल्याने व भारतीय बाजारात लोकसभा निवडणूकीचा माहोल यामुळे देशांतर्गत व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार कसे प्रतिसाद दिवसभरात देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
बीएसईत एशियन पेंटस,पॉवर ग्रीड, एनटीपीसी जेएसडब्लू स्टील, आयटीसी, टायटन कंपनी, सनफार्मा, मारूती सुझुकी, टाटा स्टील, भारती एअरटेल, एचयुएल,इंडसइंड बँक, एक्सिस बँक, नेस्ले, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट,एचडीएफसी बँक या समभागात वाढ झाली आहे तर इन्फोसिस, टीसीएस, एचसीएलटेक, एम अँड एम, कोटक महिंद्रा, लार्सन, टेक महिंद्रा, रिलायन्स या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत बीपीसीएल, हिरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, एशियन पेंटस, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रीड, अदानी पोर्टस, सिप्ला, जेएसडब्लू स्टील, भारती एअरटेल, श्रीराम फायनान्स, ओएनजीसी, बजाज ऑटो, सनफार्मा, हिंदाल्को, कोल इंडिया, इंडसइंड बँक, अदानी एंटरप्राईज, अपोलो हॉस्पिटल, एचयुएल, एक्सिस बँक, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, डॉ रेड्डीज, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट या समभागात वाढ झाली असून इन्फोसिस, टीसीएस, ग्रासीम, एम अँड एम, टेक महिंद्रा, एचसीएलटेक, विप्रो, रिलायन्स, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, ब्रिटानिया या समभागात वाढ झाली आहे.
 
Powered By Sangraha 9.0