अक्षय्य तृतीयेला रामललास ११ हजार फळांचा नैवेद्य

10 May 2024 18:16:13

Ramlala Ayodhya

अयोध्या :
अक्षय्य तृतीयेनिमित्त शुक्रवार, दि. १० मे रोजी श्रीरामललास (Ramlala Ayodhya) ११ हजार फळांचा नैवेद्य दाखवण्यात आला होता. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ निरनिराळ्या प्रकारच्या फळांची आरास तयार करण्यात आली होती. यात आंबे, संत्री, डाळिंबं, किवी, दाक्षं अशी विविध प्रकारची फळे ठेवली होती. या आरासमुळे गर्भगृह आणि रामललाची मूर्ती नेहमीपेक्षी अधिकच मनमोहक दिसत होती.

सूर्यकिरणांचा महामस्तकाभिषेक! सूर्यतिलकाने उजळले रामललांचे रुप

अयोध्येत १७ एप्रिल रोजी रामललांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. देशभरातील रामभक्तांना यावेळी सुर्यतिलकाचे (Suryatilak) दर्शन झाले. दुपारी ठीक १२ वा. च्या शुभमुहुर्तावर रामजन्म झाला आणि रामललांवर सूर्यकिरणांचा महामस्तकाभिषेक करण्यात आला. मंदिराच्या गर्भगृहात यावेळी रामललाचे अतिशय नेत्रदिपक असे रूप दिसत होते. मंदिरात सर्वत्र श्रीरामाचा जयजयकार होत होता. मंदिरात आलेल्या साऱ्या रामभक्तांचे रामललांच्या माथ्यावरील सुर्यतिलकाकडेच लक्ष्य होते.
Powered By Sangraha 9.0