Q4 Results: टाटा मोटर्स कंपनीचा तिमाही निकाल जाहीर तिमाहीतील नफा २२२ टक्क्यांनी वाढत १७४०७.१८ कोटीवर

10 May 2024 18:38:45

Tata Motors
 

मुंबई: टाटा मोटर्स कंपनीचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. कंपनीला ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या तिमाहीत १७४०७.१८ कोटींचा निव्वळ प्राप्त झाला आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील ५४०७.७९ तुलनेत यंदा नफा २२२ टक्क्यांनी वाढत १७४०७.१८ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue From Operations) मध्ये १३ टक्क्यांनी इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) बेसिसवर वाढ होत १.१९ ट्रिलियन पर्यंत हा महसूल पोहोचला आहे. मागील वर्षी कामकाजातील महसूल १.०५ ट्रिलियन होते.
 
याशिवाय कंपनीच्या महसूलात ८.६ टक्क्यांनी वाढ होत १.१० ट्रिलियनवर महसूल पोहोचले आहे. टाटा मोटर्सच्या करपूर्व व इतर खर्च पूर्व नफा (EBITDA) मागील वर्षाच्या १२८१० कोटींच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी वाढत १७०३५ कोटीवर पोहोचले आहे. एकूण वर्षाच्या निव्वळ नफ्यात वाढ होत एकूण निव्वळ नफा ३१८०० कोटींवर पोहोचले आहे.
 
निकालांवर भाष्य करताना, पी बी बालाजी, गट मुख्य वित्तीय अधिकारी म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२४ च्या निकालांची नोंद करताना आनंद होत आहे, ज्या दरम्यान टाटा मोटर्स समूहाने आपला आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल, नफा आणि विनामूल्य रोख प्रवाह वितरित केला. भारताचा व्यवसाय आता कर्जमुक्त झाला आहे आणि आम्ही आर्थिक वर्ष २०२५ मध्ये एकत्रित आधारावर निव्वळ ऑटोमोटिव्ह कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहोत. व्यवसाय त्यांच्या विशिष्ट रणनीतींवर चांगले कार्य करत आहेत आणि त्यामुळे येत्या काही वर्षांत ही मजबूत कामगिरी कायम ठेवण्याचा आम्हाला विश्वास आहे.”
 
कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येक समभागावर ६ रुपये लाभांश (Dividend) सूचवला आहे. त्यात तीन रुपये नियमित लाभांश व तीन रुपये विशेष लाभांश आहे. याबाबतीत अंतिम निर्णय भागभांडवलधारकांच्या बैठकीत घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना कंपनीचा समभाग १.६२ टक्क्यांनी वाढला होता.
 
Powered By Sangraha 9.0