पुरुषांसाठीचा ब्रँड 'तस्वा'चे पहिले मॉल स्टोअर मुंबईत सुरू

10 May 2024 15:19:32
 
tasva
 
 
मुंबई: प्रसिद्ध डिझाईनर तरुण ताहिलियानी यांच्या सहकार्याने आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड यांना मुंबईतील 'तस्वा'च्या पहिल्या मॉल स्टोअरची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. अचानक उसळलेला फ्लॅश मॉब आणि पुणेरी ढोलपथकाचे सादरीकरण यांमुळे उपस्थित स्तंभित झाले आणि हा भव्य उद्घाटन सोहळा नेत्रदीपक ठरला. या फ्लॅश मॉबमध्ये बॉलिवूड स्टार आणि ब्रँड अम्बॅसिडर असलेली अनन्या पांडे हिने प्रवेश केला तेव्हा उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रसिद्ध फॅशन डिझाईनर तरुण ताहिलियानी यांच्या उपस्थितीत अनन्या पांडे हिने या स्टोअरचे उद्घाटन केले.
 
हे स्टोअर 'तस्वा' ओबेरॉय मॉल, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे असून ते १७४६ चौरस फूट भागात पसरलेले आहे.या स्टोअरमध्ये आधुनिक भारतीयांसाठी डिझायनर एथनिक आणि लग्नाच्या पोशाखांची विस्तृत श्रेणी मांडलेली आहे. त्यामध्ये नवीन आर्ट डेको-प्रेरित डिनर जॅकेट कलेक्शनचाही समावेश आहे. त्यावर भौमितिक आकृत्या आणि ऍप्लिक व हॉट-फिक्स यांसारख्या भरतकामाच्या गुंतागुंतीच्या तंत्रांचा समावेश आहे. लग्नाच्या आणि उत्सवाच्या पोशाखांच्या श्रेणीमध्ये विविध प्रकारचे कुर्ता सेट, अचकन, शेरवानी आणि इंडो-वेस्टर्न पोशाखांचा समावेश आहे.त्याला पूरक म्हणून साफा, सरपेच, ब्रोचेस, पॉकेट स्क्वेअर, बटणे, सेहरा, स्टोल्स, शाल आणि पादत्राणे यांसारख्या ॲक्सेसरीज आहेत.
 
या स्टोअरची रचना आणि सजावट तरुण ताहिलियानी यांच्या 'इंडिया मॉडर्न' डिझाईनच्या पद्धतीनुसार असून यामध्ये भारतीय ग्राहकांमध्ये विकसित झालेल्या नवीन वास्तवाचे प्रतिबिंब आहे. ते आता स्वतःच्या निवडींमधून अधिक अर्थ आणि अभिव्यक्तीचा शोध घेतात. लाकूड, पितळ यांसारख्या आलिशान साहित्य आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातून प्रेरित अशा डिझाईन्स यांमधून एक असे वातावरण तयार होते जे भारतीय पोशाखांच्या नवीन जगासाठी प्रवेशद्वार म्हणून कार्य करते. 'तस्वा'च्या ब्रँड तत्त्वज्ञानाशी ते सुसंगत आहे.
 
अनन्याने आपले विचार व्यक्त करताना सांगितले, "या शहराचे माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. आज ओबेरॉय मॉलमध्ये 'तस्वा'ने आपले दरवाजे उघडले आहेत. पारंपारिक अभिजातता आणि समकालीन शैली यांचा हा मिलाफ पाहणे हा माझा गौरव आहे. नवरदेवांच्या फॅशनच्या अनुभवाला नवीन उजाळा देण्यासाठी 'तस्वा' कटिबद्ध आहे आणि तिची ही कटिबद्धता कौतुकास्पद आहे.'तस्वा'च्या या प्रवासाचा एक भाग बनण्यास मी उत्सुक आहे.”
 
ओबेरॉय मॉल स्टोअरच्या शुभारंभाबाबत बोलताना 'तस्वा'चे चीफ डिझाईन ऑफिसर तरुण ताहिलियानी म्हणाले, “मुंबईच्या ओबेरॉय मॉलमध्ये आमच्या स्टोअरच्या भव्य उद्घाटनाद्वारे आमचे स्वप्न साकार करणे ही सन्मानाची बाब आहे. 'तस्वा'मध्ये प्रत्येक पोशाखाची बारकाईने रचना केली जाते जेणेकरून समकालीन शैलीचा स्वीकार करत आपल्या वारशाचा गौरव व्हावा. कालातीत तंत्र आणि आधुनिक डिझाइन्स यांचा संगम अनुभवण्यासाठी आमचे नवीन मुंबई स्टोअर ही योग्य जागा आहे.'तस्वा'ची तीच ओळख आहे.”
 
'तस्वा'चे ब्रँड हेड आशिष मुकुल आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, “'तस्वा'मध्ये आम्ही धोरणात्मकरीत्या किरकोळ व्यापाराचा विस्तार करत आहोत. मुंबईतील ओबेरॉय मॉलमध्ये आमच्या पहिल्या मॉल स्टोअरचे भव्य उद्घाटन हा या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. डिझायनर वेडिंग वेअरच्या संदर्भात सहजसुलभता आणिउच्च दर्जाच्या गुणवत्तेबाबत आमच्या कटिबद्धतेचे हे स्टोअर प्रतीक आहे.”
 
Powered By Sangraha 9.0