चीनमध्ये आयात वाढल्यानंतर कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ

10 May 2024 12:02:32

Crude
 
 
मुंबई: कालपासून अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या साठ्यात घसरण होत मागणीत मोठी वाढ झाली आहे. चीनमध्ये क्रूड तेलाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ( कच्च्या) तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. चीन हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार असल्याने बाजारातील क्रूडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
 
याशिवाय युएस एनर्जी विभागाने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचे ठरवल्यानंतर बाजारात कच्च्या तेलाच्या साठ्यात घट झाली. सकाळपर्यंत WTI Future क्रूड निर्देशांकात ०.७९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड तेल निर्देशांकात ०.६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.९८ टक्क्यांनी वाढ होत प्रति बॅरेल किंमत ६६७१.०० पातळीवर पोहोचली आहे.
 
याखेरीज नॅचरल गॅस निर्देशांकातही मोठी वाढ झाली आहे. नॅचरल गॅस निर्देशांकात १.५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या भारतातील पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०४.२१ व डिझेल किंमत प्रति लिटर ९२.१५ रुपये आहे.
 
Powered By Sangraha 9.0