जुन्या रिती आणि आधुनिक विज्ञानावर भाष्य करणारा 'लाईफ लाईन'; अशोक सराफ दिसणार प्रमुख भूमिकेत

10 May 2024 17:36:03

ashok  
 
 
मुंबई : आधुनिक विज्ञान आणि जुन्या रीतिरिवाजांचा संघर्ष अशी संकल्पना असणाऱ्या लाईफ लाईन या चित्रपटात महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाच्या नावे ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून लाईफ लाईन या चित्रपटाच्या नावावरुनच चित्रपट प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे.
 
क्रिसेंडो एन्टरटेनमेंट निर्मित 'लाईफ लाईन' या चित्रपटात अभिनेते माधव अभ्यंकर देखील अशोक सराफ यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर अशी तगड्या कलाकारांची फौज आहे. साहिल शिरवैकर दिग्दर्शित ' लाईफ लाईन ' ह्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीत राजेश शिरवैकर यांचे आहेत.
 
'लाईफ लाईन' चे दिग्दर्शक साहिल शिरवैकर म्हणतात, " सामाजिक भान आणि व्यावसायिक मूल्यं राखून हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे. विधात्याने रेखाटलेली तळहातावरची 'आयुष्य रेखा' आपण वाढवू शकतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही ह्या चित्रपटातून केलेला आहे. अनोखी कथा, अनोखा संघर्ष, अनोखी मांडणी, अनोखी पात्रनिवड आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी ही ह्या चित्रपटाची वैशिष्ट्यं म्हणता येतील. बाकी अशोक सराफ सर चित्रपटांच्या निवडीबाबत किती चोखंदळ असतात हे सर्वांना माहीत आहेच. त्यांनी आमचा चित्रपट स्विकारला म्हणजे विषय संपला.
Powered By Sangraha 9.0