अमेरिकेतही तुकडे तुकडे गँग!

01 May 2024 21:12:36
ोिि
 
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठामध्ये पॅलेस्टाईन समर्थक घुसले. अमेरिकेच्या त्या प्रतिष्ठित विद्यापीठावर त्यांनी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावला. तसेच विद्यापीठाच्या ‘हॅमिल्टन’ या सुप्रिसद्ध हॉलला ‘हिंद हॉल’ हे नावही घोषित केले. अमेरिकेने इस्रायलऐवजी पॅलेस्टाईनला समर्थन द्यावे, असे पॅलेस्टाईन समर्थकांचे म्हणणे. या समर्थकांना गाझाबद्दल इतके प्रेम आहे तर थेट इस्रायलला विरोध करण्यासाठी ते पॅलेस्टाईनला का जात नाहीत? तर पॅलेस्टाईनला गेले की, इस्रायलच्या कारवाईत मृत्यूच होईल, ही त्यांना खात्री आहे. तसेच आपल्याकडे जे जेएनयुच्या ‘तुकडे तुकडे गँग’ समर्थित काही विद्यार्थ्यांना वाटते, तेच या कोलंबियामधील पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थ्यांना वाटते. त्यांना वाटते की, विद्यार्थी म्हणून आपण देशविघातक, समाजविघातक कृत्य केले, त्यावर कायदेशीर कारवाई झाली तर तथाकथित पुरोगामी ढोंगी मानवतावादी आहेतच की! हे लोक देश, समाजाची परिस्थिती चिघळवून टाकण्यासाठी आंदोलन करतील आणि म्हणतील की, विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर कारवाई करता? मानवी हक्काचे उल्लंघन करता. असो. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील गाझा समर्थक् विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. इस्रायलशी संबंधित सर्वच कंपन्यांसोबत अमेरिकेने व्यवहार थांबवावेत, इस्रायलला विरोध करावा आणि पॅलेस्टाईनचे समर्थन करावे, असे त्यांचे म्हणणे. विद्यापीठाच्या आवारात तंबू ठोकून त्यांनी आंदोलन सुरू केले.
 
या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी पैसे कोण देते? त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करते, हे प्रश्न विचारायचेच नसतात. आपल्याकडे नाही का ‘सीएए’ आंदोलनामध्ये त्या सगळ्यांना खाणेपिणे आणि पंचतारांकित सुविधा आपोआप ज्या विघातक जादूने मिळत होत्या, त्याच विघातक जादूने या कोलंबियाच्या विद्यार्थ्यांनाही आंदोलनात सुविधा मिळत होत्या. पण, या आंदोलनाला अमेरिकन प्रशासनाने भीक घातली नाही. त्यामुळे हे आंदोलक कोलंबिया विद्यापीठाच्या हॅमिल्टन हॉलमध्ये घुसले. त्यांनी इमारतीच्या खिडकीच्या काचा फोडल्या, मोडतोड केली. इमारतीचे दरवाजे बंद केले. इमारतीवर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला. विद्यापीठातील ‘हॅमिल्टन हॉल’चे नाव ‘हिंद हॉल’ म्हणून घोषित केले. आता हिंद म्हणजे काही आपल्याला जे हिंद वगैरे अपेक्षित आहे, ते हिंद नाही, तर इस्रायल-गाझा संघर्षात गाझापट्टीतील हिंद रजाब नावाची सहा वर्षांची मुलगी मृत पावली त्या मुलीचे नाव आंदोलकांनी ‘हेमल्टन हॉल’ला दिले. गाझा पट्टीतील का असेना, पण सहा वर्षांची मुलगी हकनाक मृत्यू पावते, हे दुःखद. मात्र, अमेरिकेतल्या विद्यापीठातल्या नामांकित ‘हेमल्टन हॉल’ला तिचे नाव त्या गाझा समर्थकांनी देणे, हे समर्थनीय आहे का? न्यायाने पाहिले तर वास्तूचा मालकच वास्तूचे नाव ठरवू शकतो. काही वर्षांसाठी शिकायला अलेले आणि शिकणे वगैरे सोडून आंतरराष्ट्रीय घटनांवर अनधिकृत बेकायदेशीर कृत्य करणार्‍या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या हॉलचे नाव बदलण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकारच नाही. पण, हिंसा आणि बेकायदेशीर कृत्याने सगळे साधते, अशी विकृत मानसिकता असलेल्या लोकांना कायद्याच्या आणि नीतीच्या गोष्टी कळतील तर ना?
 
असो. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर कब्जा केला, तोडफोड केली म्हणून विद्यापीठाच्या प्रशासनाने पोलिसांना संपर्क केला. १०० पोलीस आले आणि त्यांनी विद्यापीठात दरवाजे लावून सुरक्षित लपलेल्या विद्यार्थ्यांना पकडले. या घटनेचे पडसाद संयुक्त राष्ट्र संघापर्यंत गेले. हे विद्यार्थी एका देशात दुसर्‍या देशाचा झेंडा फडकवत होते. त्यांनी अवैधरित्या विद्यापीठ ताब्यात घेतले, यावर मानवाधिकार आयोगाचे उच्चायुक्त वोल्कर टर्क यांनी काहीही मत व्यक्त केले नाही. मात्र, विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ते निषेध आंदोलन करू शकतात. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करावे, असे टर्क मात्र जरूर म्हणाले. तसेच या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केली, यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. या सगळ्या परिक्षेपात अमेरिका हे आंदोलन आणि त्यानुसार उद्भवलेल्या परिस्थितीबाबत काय करेल? अभिव्यक्तिस्वातंत्र्य, सहिष्णुता, पुरोगामित्व वगैरेचे काय करेल? खरे तर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत अराजकता माजवणार्‍या, विघातक लोकांसाठी मानवी हक्क, सहिष्णुता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे संकल्पना असाव्यात का? यावर आता सगळ्या जगाने विचार करण्याची गरज आहे.
९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0