सोलापूर : राज्यात लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु असताना काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मावशींनी प्रणिती शिंदे आणि काँग्रेसची पोलखोल केली आहे.
या व्हिडीओमध्ये बोलणाऱ्या मावशी म्हणाल्या की, "प्रणिती शिंदे आमच्याकडे येत पण नाही. त्या तिकडेच जातात. आम्ही त्यांना निवडून देणार नाही. आम्ही कमळाला मत देऊ. आम्हाला नियमित धान्य मिळत आहे. आमची पगारवाढ केली. तसेच दवाखान्याचे ५ लाख मंजूर केले आहेत. एवढे वर्षे निवडून येऊन कुणीही घरापर्यंत आलेलं नाही. घेणारे घर भरून घेतात. ते आपल्या सुटकेस भरून घेतात. आम्हाला ५ रुपयेदेखील देत नाहीत. मोदी इथे नाही आलेत तरी चालतं पण ते आम्हाला बसल्या ठिकाणी देतात. त्यामुळे यावेळी मोदीजीच निवडून यायला हवेत."
हे वाचलंत का? - जयंत पाटील नाराज! खुद्द फडणवीसांनीच केला खुलासा
सोलापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. तसेच सोलापूरमध्ये महायूतीकडून राम सातपूते यांना तिकीट मिळाले आहे. दरम्यान, आता प्रणिती शिंदेंच्या मतदारसंघाची अवस्था दर्शवणारा एक व्हिडीओ पुढे आला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे.