आता युपीआय अँपवर कर्जाचे हप्ते भरता येणार !

05 Apr 2024 18:14:17

UPI
 
मुंबई: एनपीसीआयने युपीआय व्यासपीठावर रुपे क्रेडिट कार्ड सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना ईएमआय, क्रेडिट कार्ड बिल पेमेंट,क्रेडिट लिमिट अँडजस्टमेंट अशा विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या देयप्रणाली पूर्णपणे सुरक्षित असून ग्राहकांना यामुळे पटकन व्यवहार करणे शक्य झाले आहे. ३१ में २०२४ पाहून या नवीन सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
 
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) २९ मार्चला ही घोषणा केली आहे. या क्रेडिट कार्डला सुरूवातीला काही ठराविक रक्कम क्रेडिट लिमिट म्हणून मर्यादा ठेवली जाणार आहे. या सुविधा आपल्या युपीआयशी संलग्न असणार आहेत. यातून कर्जदार आता आपले कर्जाचे हप्ते सुलभपणे भरू शकणार आहेत.
 
आता पैसे युपीआयमार्फतही जमा करता येणार -
 
आतापर्यंत केवळ रक्कम एटीएममध्ये रक्कम भरण्याची सोय होती.परंतु आता एटीएम मशिन मध्ये युपीआयच्या मदतीने रक्कम भरता येणार असल्याचे आज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बोलताना घोषित केले आहे.आतापर्यंत डेबिट कार्डच्या माध्यमातून ही रक्कम सीडीएम (Cash Deposit Machines) मध्ये भरण्याची सोय होती. आता युपीआर मार्फत देखील रोख रक्कम जमा करता येणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0