या आठवड्यात अर्थव्यवस्थेची नवीन दिशा कळेल !

03 Apr 2024 11:56:02

Global Economy
 
मुंबई: या आठवड्यात गुंतवणूकदारांची दशा व दिशा अनेक मुद्यांवर ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेचे आगामी पतधोरणातील रेपो रेटचे दर, वैश्विक अर्थव्यवस्था, परदेशी गुंतवणूक व कंपन्यांचे तिमाही निकाल अशा विविध आघाड्यांवर अर्थव्यवस्थेतील पुढील बदल निश्चित होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
चांगली आकडेवारी येत सकारात्मक बदल होण्याची तज्ञांची आशा आहे. परंतु जगातील आर्थिक दबाव, महागाई दर व डॉलर रुपया तुलना अशा कसोट्यांवर देशाची अर्थव्यवस्था पास झाल्यास मात्र अर्थव्यवस्थेत आणखी भरभराट येऊ शकते. आज मध्य पूर्वतील इंधनाचा वाढता दबाव, संभाव्य महागाई, तेलाची वाढती मागणी पाहता आज इंधनात मोठी भाववाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी वाढ झाली आहे. मात्र भारताच्या निर्यातीत व देशांतर्गत उत्पादनात वाढ झाल्याने भारतात अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे लक्षण आहे.
 
शेअर बाजारात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २४.८५ टक्क्याने वाढ झालेली आहे. परंतु आगामी काळातील देशांतर्गत व परदेशी अर्थव्यवस्थेतील होणारे बदल पाहणे हे निश्चितच महत्वाचे ठरणार आहे. आरबीआयची पतधोरण समितीची बैठक ३ ते ५ एप्रिल या दरम्यान होणार असून आगामी काळातील संभाव्य महागाई दर यामुळे लवकरच स्पष्ट होईल. आज जेरोम पॉवेल यांचे युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात बाबतीत भाष्य होऊ शकते असे संकेत प्रसारमाध्यमांनी दिले आहेत.
 
अशा विविध कारणांमुळे तज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेची पुढील दिशा हे या कारणांमुळे ठरवू शकतात असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे हा आठवडा शेअर बाजारासाठी व अर्थव्यवस्थेसाठी महत्वपूर्ण राहण्याची शक्यता दिसत आहे.
 
Powered By Sangraha 9.0