'एक हृदय, एक समज, एक विचार...', बहुप्रतिक्षित 'मैदान'चा फायनल ट्रेलर रिलीज

03 Apr 2024 15:44:43
अजय देवगणची प्रमूख भूमिका असलेला 'मैदान' चित्रपट १० एप्रिल रोजी होणार प्रदर्शित
 

maidan  
 
मुंबई : बहुप्रतिक्षित ‘मैदान’ (Maidaan Trailer) चित्रपटाला अखेर ४ वर्षांनंतर प्रदर्शनाचा मुहुर्त मिळाला आहे. अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘मैदान’ (Maidaan Trailer) चित्रपटाचा दमदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. अजय देवगण पहिल्यांच स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अजय भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
 
अजय देवगण पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका साकारत आहे. मैदान हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असून ज्यात १९५२ ते १९६२ पर्यंतचा काळ दाखवण्यात आला आहे. भारतासाठी हा काळ फुटबॉलच्या बाबतीत महत्वाचा होता असे म्हटले जाते. दरम्यान, अजय देवगणने मैदान चित्रपटाचा फायनल ट्रेलर शेअर करत कॅप्शन लिहिले आहे की, 'एक हृदय, एक समज, एक विचार, एस.ए. तुम्हीसुद्धा रहीम आणि त्याच्या टीम इंडियाच्या अकथित सत्य कथेचे साक्षीदार व्हा. या मैदानामध्ये १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात या.'
 
 
 
मैदान चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे झाल्यास, ही कथा भारतीय फुटबॉल प्रशिक्षक आणि भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे अब्दुल रहीम यांची आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले रहीम भारताच्या फुटबॉल टीमचे प्रशिक्षक होते. या चित्रपटात रहीम आणि फुटबॉलच्या मैदानाचे नाते उलगडले जाणार आहे. देशभरात मैदान १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाशी होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0