मुंबईत सोन्याचे दर ६४१०० प्रति तोळा सोन्याचे नवे उच्चांक !

03 Apr 2024 11:32:37

Gold
 
मुंबई: युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात कपात होण्याची चिन्हे जेरोम पॉवेल यांच्या भाषणानंतर शक्यता दिसल्याने सोन्याच्या भावात मोठी दरवाढ झाली आहे. पुरवठ्यपेक्षा वाढलेल्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारले आहेत. सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वरखाली होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. सोन्याबरोबर चांदीच्या किंमतीतही भाव वाढ झाली आहे
.
सकाळी ११.१५ च्या सुमारास एमसीएक्सवर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोने निर्देशांक ०.६३ टक्क्याने वाढत ६९३६९.०० या उच्चांकावर सोने पोहोचले आहे. चांदीच्या निर्देशांकात १.३२ टक्क्याने वाढ होत ७८०५३.०० पातळीवर चांदीचे दर पोहोचले आहेत. ३ एप्रिलला सोन्याचे दर ६९३६० रुपये प्रति तोळा इथपर्यंत पोहोचले आहेत.
 
भारतात प्रति ग्रॅम सोन्याचे दर ७५ रूपयांनी सरासरी वाढल्याचे स्पष्ट दिसले आहे. भारतातील सराफाबाजारात २२ कॅरेट सोन्याचे भाव प्रति १ ग्रॅम ६४१० वर व २४ कॅरेट सोने दर प्रति ग्रॅम ६९८७ रुपयांवर पोहोचले आहे.
 
मुंबईत २२ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅम दर ७५० रूपयांनी वाढले असून २४ कॅरेट सोने दर प्रति १० ग्रॅम ७६० रुपयांनी वाढले आहेत. २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम किंमत ६४१०० रुपये व २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम किंमत ६९८७० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
 
चांदीच्या प्रति किलो दरात देखील मुंबईत भाववाढ झाली आहे. प्रति १ किलो चांदी २००० रुपयांनी वाढत ८१००० रुपयांना पोहोचली आहे. गेल्या ७ दिवसांत चांदीच्या भावात देखील वेगात वाढ झाली आहे.
 
Powered By Sangraha 9.0