सोलापूरात पवारांच्या शहाला फडणवीसांचा २४ तासांत काटशह

काँग्रेस नेते देवेंद्र कोठेंचा भाजपमध्ये प्रवेश

    24-Apr-2024
Total Views |
Devendra Fadnavis (2)
सोलापूर : शरद पवार यांनी भाजप नेते संजय क्षीरसागर यांना गळाला लावल्यानंतर आता भाजपतर्फे देवेंद्र फडणवीसांनीही या डावपेचाला उत्तर दिलं आहे. फडणवीसांनी सोलापूरच्या राजकारणात लक्ष घालत महाविकास आघाडीला दणका दिला आहे. सोलापूरचे काँग्रेस नेते देवेंद्र कोठे यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.

विशेष म्हणजे देवेंद्र कोठे हे सुशील कुमार शिंदेंचे निवडणूक कॅप्मेन सांभाळणारे तात्या कोठेंचे नातू आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभेत मविआला हा मोठा धक्का मानला जात आहे. क्षीरसागर यांनी माझा दहा वर्षे अपमान झाल्याचे म्हणत पवार गटाची वाट धरली. त्यानंतर लगेचच फडणवीसांनी लक्ष घालत कोठे यांचा भाजप प्रवेश करुन घेतला. शरद पवारांच्या या खेळीचा फटका सोलापूरात मविआच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना बसू शकतो.