क्लासेस बंद, परिक्षा रद्द अन् जीव धोक्यात! अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये हमास समर्थक दंगेखोरांचा हैदोस

    24-Apr-2024
Total Views |
America university
 
वॉशिंग्टन डी. सी : अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये हमास समर्थकांनी दंगे केले आहेत. या दंग्यात हमास समर्थकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची बातमी आली आहे. हमास समर्थकांनी घातलेल्या या गोंधळामुळे अमेरिकेतील जवळपास सर्वच विद्यापीठांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हमास समर्थक दंगेखोरांना रोखण्यासाठी अमेरिकेच्या प्रशासनाने सुद्धा कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
 
 
आंदोलकांनी सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील विविध विद्यापीठांतील लोकांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी, न्यूयॉर्क विद्यापीठात १३३ आंदोलकांना पोलिसांनी अटक करण्यात आली, ज्यांना नंतर सोडण्यात आले, नुकतेच न्यूयॉर्क विद्यापीठात एनवायपीडी (न्यूयॉर्क पोलीस विभाग) अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर खुर्च्या आणि बाटल्या फेकण्यात आल्या. या हल्ल्यात अनेक अधिकारी जखमी झाले.
 
 
यानंतर येल विद्यापीठात ६० जणांना अटक करण्यात आली, त्यापैकी ४७ विद्यार्थी होते. त्यांना बऱ्याच काळापासून आंदोलन स्थळ खाली करण्यास सांगितले जात होते, परंतु त्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या आदेशला मानलं नाही. उलट त्यांनी परिसरातील दुसऱ्या भागातही आंदोलन केली. कॅलिफोर्निया स्टेट पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमध्ये अशाच प्रकारच्या निदर्शनांमुळे विद्यापीठ बंद करावे लागले.
 
 
अमेरिकन विद्यापीठांमध्ये पॅलेस्टाईनसाठी आंदोलनाची व्यापकता वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण विद्यापीठांवर परिणाम होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे आहे त्यांना अभ्यास करता येत नाही. शिक्षकांना वैयक्तिक वर्ग रद्द करावे लागत आहेत. सेमिस्टर संपले आहे पण परीक्षा होत नाहीक. कॉलेज प्रशासनाची ही अवस्था पाहून कोलंबियातील पालकांनी त्यांची जमा केलेली फी परत करण्याची मागणी सुरू केली आहे. जे विद्यार्थी आंदोलन करत नाहीत त्यांनी आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.