काँग्रेस सत्तेवर आली तर तुमची संपत्ती सुद्धा काढुन घेईल; नरेंद्र मोदींचा छत्तीसगडमध्ये काँग्रेसवर हल्लाबोल

    24-Apr-2024
Total Views |
ram mandir
 
रायपुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील सुरगुजा येथे झालेल्या सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी वारसा कराराबाबत केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांचा समाचार घेतला आहे. काँग्रेस सत्तेवर आली तर तुमची संपत्ती सुद्धा काढुन घेईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. तुम्ही हयात असतानाच नाही तुमच्या आयुष्यानंतरही काँग्रेस तुमची लुट करते. असंही त्यांनी म्हटलं.
 
पीएम मोदींनी १८ एप्रिल २०२४ला भाजप उमेदवार रेणुका सिंह यांच्या समर्थनार्थ सुरगुजा येथे रॅलीला संबोधित केले. या काळात त्यांनी संपत्तीचे पुनर्वितरण आणि मृत्यूनंतर मालमत्ता जप्ती या मुद्द्यांवरून काँग्रेसला कोंडीत पकडले. २०१४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान अंबिकापूरच्या लोकांनी लाल किल्ला बांधला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.
 
देशविरोधी लोकांना भ्रष्टाचार चालू राहावा आणि देशात प्रत्येकजण एकमेकांशी लढत रहावा यासाठी इंडी आघाडीचे सरकार हेव आहे. काँग्रेसच्या काळात नक्षलवाद आणि दहशतवाद पसरला. काँग्रेसचा चुकीचा कारभार आणि निष्काळजीपणा हेच देशाच्या बरबादीचे कारण आहे. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
  
काँग्रेसच्या प्रवकत्या सुप्रिया श्रीनेत यांनी काही दिवसांपुर्वी नक्षलवाद्यांचा शहीद असा उल्लेख केला होता. त्यावरही पंतप्रधान मोदींनी हल्ला चढवला. “दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यावर या काँग्रेसचा सर्वात मोठा नेता अश्रू ढाळतो. त्यामुळे काँग्रेसने देशाचा विश्वास गमावला आहे. असं ते पुढे म्हणाले.
 
तुम्ही तुमच्या मेहनतीने जमा केलेली संपत्ती तुमच्या मुलांना देऊ शकणार नाही, तर काँग्रेस ती हिसकावुन घेईल. कारण आयुष्यात आणि आयुष्यानंतरही जनतेला लुटणे हा काँग्रेसचा मंत्र आहे. जेव्हा तुम्ही जिवंत असाल, तेव्हा ते तुमच्यावर जास्त कर लावेल, जेव्हा तुम्ही जिवंत नसाल तेव्हा ते वारसा कर लादतील.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.