दक्षिण कोरियामध्ये दाऊद किम या सुप्रसिद्ध पॉप गायकाने युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ पोस्ट केला. ”मी इंचियोनो येथे १ कोटी, १३ लाख, ७२ हजार, ४९७ रुपयांची जमीन खरेदी केली आहे. लवकरच तिथे भव्य मशीद बांधणार आहे. माशाअल्ला देशातल्या प्रत्येक रस्त्यावर मधुर अजानचे स्वर ऐकू यायला हवेत. त्यासाठी मी मनापासून प्रयत्न करतोय.” असा त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला. मात्र, स्थानिक लोक विरोध करत म्हणाले, ”इथे मशीद बांधल्यामुळे आमच्या घराच्या किमती कमी होतील. मशिदी बांधायच्या असतील, तर मुस्लीम देशात जा.” सर्वच स्तरातून विरोध झाल्यावर त्याने मशीद न बांधण्याचा निर्णय दाऊदने घेतला, तर व्हिडिओ बनवल्यावर लगेचच किमला त्याने ज्याच्याकडून जमीन खरेदी केली होती, त्याचा फोन आला. तो म्हणाला, ”जमिनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तू मशीद बनवणार आहेस, हे मला सांगितले नव्हते.
मला तुला जमीन विकायची नाही. आपली डिल कॅन्सल” तसेच त्या परिसरातले लोक एकत्र आले. त्यांनी मशीद बनवण्याच्या विरोधात आंदोलन केले. तिथे पत्रके वाटली. ”इथे मशीद बनली, तर आमच्या परिसरातील घरांच्या किमती कमी होतील. आम्हाला इथे असे काही नको. सौदी अरेबियात चालते व्हा!” स्थानिक प्रशासनाने जाहीर केले की, ”आमच्याकडे मशीद बनवण्यासाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे बनणारी मशीद ही अनधिकृत आहे.” इतकेच काय, दक्षिण कोरियामध्ये मुस्लिमांच्या प्रमुख संघटनेने जाहीर केले की, ”देशातील प्रत्येक मशीद आमच्यामार्फतच बांधली जाते. दाऊद किम जर अशी वैयक्तिक मशीद बांधत असेल, तर आमचे समर्थन नाही.” त्यामुळे दाऊद किमने मशीद न बांधण्याचा निर्णय घेतला.
दाऊद किम हा पूर्वाश्रमीचा ख्रिश्चन धर्मीय पॉप स्टार किम क्यू वू. त्याला ‘जे किम’ही म्हणायचे. २०१९ साली त्याने इस्लमाच्या खुबसुरतीविषयी बोलायला सुरुवात केली. ख्रिस्ती असूनही किम इस्लामविषयी बोलतोय म्हणून जगभरातल्या मुस्लिमांनी त्याला डोक्यावर घेतले. पुढे २०२० साली त्याने पत्नीसकट मुस्लीम धर्म स्वीकारला. मात्र, त्यानंतरही नशा करतानाचे, लैंगिक संबंध ठेवतानाच्या पोस्ट्स त्याने समाजमाध्यमांवर टाकल्या. याचकाळात एका मुस्लीम महिलेने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला, तर त्याच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचारासंदर्भात आरोप केले. या दोन्ही गुन्ह्यांचे पुरावे होते, हे विशेष. पण, त्यामुळे त्याला मशीद बांधण्यासाठी विरोध झाला का? तर अजिबात नाही. दक्षिण कोरियाच्या समाजअभ्यासकांच्या मते, उज्बेकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि पाकिस्तानमधून मुस्लीम दक्षिण कोरियामध्ये कामधंद्यासाठी किंवा शिकण्यासाठी येतात आणि संघटित होऊन, त्यांची संस्कृती ते स्थानिकांवर लादण्याचा प्रयत्न करतात.
उदाहरणार्थ, देशात ‘क्युंगपुक नॅशनल युनिव्हर्सिटी’ आहे. इथे पाकिस्तानच्या मुआज रजाकने शिकण्यासाठी प्रवेश घेतला. २०२१ साल होते ते. रजाकने विद्यापीठात शिकत असलेल्या जगभरातील मुस्लीम विद्यार्थ्यांना एकत्र केले. त्यांनी विद्यापीठालगतच्या परिसरातील एक जुन्या मशिदीचे पुनर्निर्माण करण्याचे ठरवले. त्यांचे काम सुरू झाले. तेव्हाही स्थानिक लोकांनी त्यांना विरोध केला. लोकं म्हणाली, ‘’तुम्ही संघटितपणे दररोज पाचवेळा इथे जमाल. मग इतर धर्मीय इथे येणार नाहीत. आमच्या परिसरातील घराच्या दुकानाच्या किमती घसरतील.” स्थानिकांनी विरोध करताच परदेशी मुस्लीम विद्यार्थ्यांनी धार्मिक स्वातंत्र्याचे हनन झाले म्हणत दक्षिण कोरियाच्या न्यायालयात याचिका दाखल केली.
न्यायालयाने धार्मिक स्वातंत्र्य मान्य करत, मशीद बांधण्याचे समर्थन केले. लोकांचे म्हणणे होते की, या सगळ्यासाठी विद्यार्थ्यांना जागतिक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी मदत केली. तसेच, मुस्लीम देशातून आर्थिक मदतही केली गेली. त्यामुळे स्थानिक लोक संतप्त झाले. त्यांनी मशिदीसमोर तिन्ही त्रिकाळ नाचगाणी करणे, पोर्क बार्बेक्यु पार्टी करणे, डुकरांचे मुंडके ठेवून निषेध करणे वगैरे सुरू केले. या लोकांचे म्हणणे होते की, “हे सगळे करायला परदेशी विद्यार्थ्यांनी भाग पाडले. एक तर ते परदेशी आहेत. शिकायला आले होते. आता संघटित होऊन स्थानिकांना विरोध करत आहेत. जगभरात काय सुरू आहे, हे आम्ही पाहतो.” असो. नवमुस्लीम असलेल्या दाऊद किमची माघार पाहून वाटते की, संघटित जनशक्तीच्या हातातच देश आणि समाजाचे वर्तमान आणि भविष्यही आहे. भारतातल्या बहुसंख्यकांनो ऐकताय ना?
९५९४९६९६३८