सत्य नाकारताना...

23 Apr 2024 22:09:53
scc

जांची भूमिका करणार्‍या चिन्मय मांडलेकरांनी लेकराचे नाव ‘जहांगिर’ ठेवले, तर तुमचे काय गेले? मुलाचे नाव ‘जहांगिर’ म्हणून ट्रोल झाल्यावर छत्रपतींची भूमिकाच साकारणार नाही, असेही मांडलेकर वर म्हणाले. पण, मग तुमचे काय गेले? तथाकथित पुरोगामी निधर्मी आणि हिंदूद्वेष्ट्या लोकांचा हा सवाल आहे. अर्थात ते त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. मात्र, ‘तैमुर’ आणि ‘जहांगिर’ नावाबद्दल त्यांना इतके ममत्व का, याचे उत्तर ते देत नाहीत. शेक्सपियरने म्हटलेच आहे की, ‘नावात काय आहे?’ पण, शेक्सपियरच्या साहित्यकृतींवर लेखक म्हणून दुसर्‍याच कुणाचे नाव लिहिले असते, तर शेक्सपियरलाही ते चालले नसते. हो, या परिक्षेपात पालकांनी त्यांच्या मुलांचे नाव काहीही ठेवले, तरी तो त्यांचा हक्क आहे. अगदी जहांगिरपासून अफजल, औरंगजेब ते काहीही ठेवोत. अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. पण, मग त्या नावांमागचा इतिहास कसा आणि का बरं विसरायचा? ‘तैमुर’ किंवा ‘जहांगिर’ ही नावं ऐकताच डोळ्यांसमोर काय येते? त्यांची धर्मांधता, अत्याचारच आठवतात. यावर पुन्हा काही लोक सांगतीलच की, ‘जहांगिर म्हणजे तो नाही काही, तर जहांगिर पारशी शब्द आहे.’ पण, मांडलेकर दाम्पत्याला ज्यांनी ट्रोल केले, त्यांचा आक्षेप धर्मांध जहांगिराला होता. हे चिन्मय मांडलेकरांना कळले नसेल काय? भाबडा प्रेक्षक नटाच्या भूमिकेवरूनच नटाला ओळखतो. या भाबड्या प्रेक्षकाचे भाव समजून घेत दुर्लक्ष करता येण्यासारखे होते. काही त्यात टवाळही होतेच. त्यांचे ट्रोलिंग आक्षेपार्हच. पण, त्यांना विरोध म्हणून ‘छत्रपतींची भूमिका करणार नाही,’ असे चिन्मय मांडलेकरांनी म्हणणे, हे अतर्क्यच. छत्रपतींच्या नावाने नुसता गुलाल उधळायला मिळाला, तरी धन्य होणारा मराठमोळा जीव. चिन्मयच्या या विधानाने अस्वस्थ झाला. ती अस्वस्थता यासाठी होती की, मराठमोळ्या मांडलेकर-जोशी दाम्पत्याने मुलाच्या ‘जहांगिर’ नावासाठी छत्रपतींची भूमिका सोडली. त्यांनी ही भूमिका नाकारली, तर त्या भूमिकेसाठी दुसरा कोणताच अभिनेता मिळणार नाही का? तर तसे नाही. एकापेक्षा एक सरस कलाकार आहेतच. ‘रामकृष्णही आले गेले त्या विना जग का ओसची पडले’ हे त्रिकालाबाधित सत्य. कोणावाचून कोणाचे अडत नाही. हे सत्य जहांगिरचे बाबा असलेल्या चिन्मय यांना माहीत नाही का?

‘भारताने हरवले शोध यात्रा’

पंतप्रधान बनू शकतो. कोण म्हणाले काय, मी आल्यावरच बहार येते, असे म्हणणारे ते, उद्धव ठाकरे या माझ्या भावाचे ‘राईट हॅण्ड’ म्हणाले मला! मला सगळे समजते, मला सगळे येते हे त्यांना कसे कळले? हं, माझ्या ‘मोहब्बतचे दुकान’ त्यांनाच समजले आहे फक्त. पण, ग्रेट खली अंकलना कसे हे माहीत नाही. ते मला म्हणाले की, ‘राहुल स्वत:च जुमला आहे.’ मी इतका देशभर फिरलो, जिथे जाईन तिथे अदानी-अंबांनींविरोधात बोललो. सावरकरांची आणि रा. स्व. संघाची यथेच्छ निंदा काय कमी केली? काय आहे ना, ती निंदा केली म्हणून मला कोर्टाची पायरी पुन्हा चढायला नको. आपला ‘सेफ गेम’ खेळलेला बरा. ते कमळवाले आणि त्यांचे चाहते काय करतील, याचा नेम नाही. नेम वरून आठवले, ‘धनुष्यबाणवाले’ आता ‘कमळवाल्यां’कडे आहेत आणि आपल्याकडे आता ‘मशालवाले’ आहेत. काय गंमत आहे ना, ‘मशाल’ पेटवायला आणि ‘तुतारी’ फुंकायला पण ‘पंजा’ पाहिजे. काय म्हणता, ‘उघडं गेलं नागड्याकडे आणि थंडीने मेलं?’ असू दे!!! आम्ही एकदा निवडून आलो की कळेल. आम्ही श्रीमंत लोकांचे सर्वेक्षण करणार. काय म्हणता, त्यात माझे आणि माझ्या ताईचे तसेच जिजूंचेही सर्वेक्षण होणार की नाही? तर नाही. सगळे नियम-कायदे लोकांसाठी, तर एकदा सत्तेत आलो, की आम्ही श्रीमंत लोक कोण आहेत? ते कोणत्या जातीचे आहेत, हे तपासणार. मग ज्यांच्याकडे संपत्ती नाही, त्यांना ती वाटणार. कोणाला वाटणार? ते काय सांगायला पाहिजे का? आम्ही सगळे पक्ष एकत्र झालो कशासाठी? इतक्या निवडणुका लढविणार, इतक्या निवडणुका जिंकणार, जनतेवर इतके उपकार आम्ही करणार, मग त्याचे बक्षीस नको का आम्हाला. काय म्हणता? जनता निवडून देणार नाहीच. त्यामुळे सत्तेत येणार नाहीच. त्यामुळे देशात जातीपातीचा विद्वेष पसरवता येणार नाही. हं, म्हणजे मग मी काय करू? मग शरद अंकल काय करणार? माझा काही वर्षांपासून भाऊ झालेला उबाठा त्यांचे काय होणार? काय म्हणता, माझे ‘मोहब्बत की दुकान’ अंकलचे ‘भाई’चार्‍याचे दुकान आणि माझ्या नव्या भावाचे ‘महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होणार’ या ऐतिहासिक वाक्याचे दुकान बंद होणार? असू दे, त्यावेळी अंकल आणि माझा नवा भाऊ, आम्ही सगळे हरलेलो असू. मग मी सगळ्यांना सोबत घेऊन तिसरी यात्रा काढेन, ‘भारताने हरवले शोध यात्रा’.
-९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0