Q4 Results: विप्रो कंपनीचा तिमाही निकाल जाहीर: ७.६० टक्यांनी निव्वळ नफ्यात घसरण

20 Apr 2024 13:11:11

Wipro
 
 
मुंबई: विप्रो या देशातील आयटी कंपनीने आपला चौथ्या तिमाहीतील निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७.६० टक्यांनी निव्वळ नफ्यात घसरण झाली आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीला ३०९३.५० कोटींचा नफा झाला होता जो यावर्षी घसरून २८५८.२० कोटींची झाला आहे. कंपनीच्या एकत्रित महसूलात देखील घसरण झाली आहे. मागील आर्थिक वर्षातील २३१८०.३० कोटींवरून महसूल घसरत २२२०८.३० कोटींवर पोहोचला आहे.
 
मागील तिमाहीतील तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील तिमाहीत कंपनीला २६९४ कोटींचा नफा झाला होता. याआधीच्या तिमाहीत कंपनीचा महसूल २२२०५ कोटींवर होता जो वाढत यावेळी २२२०८.३ कोटी झाला आहे.
 
याविषयी बोलताना आर्थिक वर्ष २४ हे आमच्या उद्योगासाठी आव्हानात्मक वर्ष ठरले, आणि व्यापक आर्थिक वातावरण अनिश्चित राहिले. तथापि,मी पुढे असलेल्या संधींबद्दल आशावादी आहे," असे विप्रोच्या सीईओ आणि एमडी श्रीनी पलिया यांनी सांगितले.
 
याविषयी अधिक माहिती देताना पुलिया म्हणाल्या, 'आम्ही एका मोठ्या तांत्रिक बदलाच्या उंबरठ्यावर आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता आमच्या ग्राहकांच्या गरजा बदलत आहे कारण ते स्पर्धात्मक फायद्यासाठी आणि वर्धित व्यवसाय मूल्यासाठी त्याच्या सामर्थ्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. विप्रोमध्ये, आम्ही या क्षणासाठी तयारी करत आहोत.'
 
शुक्रवारी विप्रो कंपनीच्या समभागात १.७ टक्क्यांनी वाढ झाली होती. जानेवारी महिन्यातील संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतल्याप्रमाणे कंपनीने प्रति समभाग १ रुपयांचा लाभांश (Dividend) देण्याचे ठरवले आहे.
 
Powered By Sangraha 9.0