एलोन मस्क यांचा भारतीय दौरा लांबणीवर

20 Apr 2024 12:18:41

Musk
 
 
मुंबई: टेस्लाचे मुख्य एलोन मस्क यांचा भारत दौरा रद्द झाला आहे. टेस्ला प्रकल्प भारतात यावा यासाठी सरकारने एलोन मस्क यांच्याशी बोलणी सुरु केली होती. टेस्लाने ईव्ही कार बनवण्यासाठी भारतात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले असताना याबाबत पुढील बोलणी करण्यासाठी मस्क यांचा दोन दिवसीय दौरा भारत दौरा होणार होता. या दरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत इतर उद्योगपती,धोरणकार व सरकारी अधिकारी यांची भेट मस्क घेणार होते.
 
परंतु ऐनवेळी एलोन मस्क यांनी हा दौरा रद्द करून यावर्षी पुढे ढकलला आहे.दौरा का पुढे ढकलला याचे खात्रिलायक कारण अजून समोर आलेले नाही. सरकारने देशांतर्गत उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी कंबर कसली होती. परदेशी गाड्या आयात न करता स्थानिक पातळीवर कारची निर्मिती व्हावी यासाठी सरकारने प्राधान्य दिले आहे. मस्क यांचा ३ अब्ज डॉलर्सचा टेस्ला प्रकल्प भारतात येण्याची चिन्हे आहेत.
 
दरम्यान एलोन मस्क यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा एक्स वर केली आहे. एक्स पूर्वीचे ट्विटर कंपनीचे मालकही एलोन मस्क आहेत. या भारत भेटी दरम्यान टेस्ला प्रकल्पाची घोषणा होण्याची शक्यता होती. परंतु दौरा पुढे ढकलल्याने या वर्षाच्या अखेरपर्यंत ही घोषणा होण्याची शक्यता आहे.
 
Powered By Sangraha 9.0