"अशोक चव्हाणांनी काँग्रेसला दिला धक्का", नांदेडमध्ये काँग्रेसला पुन्हा खिंडार

20 Apr 2024 15:34:12
sangrah
 
नांदेड : एकिकडे निवडणुकीची धामधुम सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांचे पक्ष सोडण्याचे सत्र सातत्याने सुरु आहे. देशभरात अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनंतर त्यांची राज्यसभेसाठीही निवड करण्यात आली. अशोक चव्हाणांनी आता काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. नांदेड मधील काँग्रेस आणि बीआरएसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
 
नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. या मध्ये भोकर बाजार समितीचे माजी संचालक आनंदराव रावणगांवकर, बीआरएसचे रिठा येथील माजी सरपंच माधवराव कन्नेवाड, भोसी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुरेश पाटील कल्याणकर, डॉ. अशोकराव देशमुख, वसंतराव देशमुख भोसीकर यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबतच शेकडो कार्यकरत्यांनीही भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
 
गेल्या दिड महीन्यात महाराष्ट्रातुन ७ नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या सात नेत्यांमध्ये अशोकराव चव्हाण, उल्हास पाटील, अर्चना पाटील चाकुरकर, बसवराज पाटील, नामदेव उसेंडी, पद्माकर दवळी, यांचा समावेश आहे. त्याआधी काँग्रेसचे मुंबइतील मोठे नेते मिलींद देवरा यांनीही काँग्रेस सोडुन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Powered By Sangraha 9.0