हिंदी कलाकारांच्या स्टारडमचा स्वकंपन्यांना फायदा, २-३ वर्षात १०० कोटींची उलाढाल

02 Apr 2024 14:28:38

celebs  
 
मुंबई : देशाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक कलाकारांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात गेल्या काही काळात दिसून आला आहे. बड्या हिंदी कलाकारांनी (Stardom) उद्योग क्षेत्रात पाऊल टाकत स्वत:चे ब्रॅण्ड सुरु केले. त्यांनी स्वत:च्या कंपन्या सुरु केल्यामुळे फार कमी काळात कोटींच्या घरात या कंपन्यांनी आर्थिक उलाढाली केल्या आहेत. यात कैटरिना कैफ, दीपिका पडूकोण, संजय दत्त अशा अनेक (Stardom) कलाकारांच्या नावाची यादी आहे.
 
हिंदीतील या मोठ्या स्टार्सने आपल्या स्टारडमच्या बळावर अगदी २ ते ३ वर्षात कोटींची कमाई केली आहे. अभिनेत्री कैटरिना कैफ हिने २०१९ साली 'के ब्युटी' (Kay Beauty) हा ब्रॅण्ड लॉंच केला होता.मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या दोन वर्षांत म्हणजे २०२२ मध्ये या कंपनीने १०० कोटींची कमाई केली.इतकेच नव्हे तर १५ लाखांपेक्षाही अधिक ग्राहकांनी तिच्या या ब्युटी प्रोडक्ट्सना प्राधान्य देखील दिले.कमी कालावधीत १०० कोटींच्या पुढे उलाढाल करणाऱ्या या कंपनीला खरं तर कैटरिनाच्या स्टारडमचा अधिक फायदा झाला असे नक्कीच म्हणावे लागेल. हे प्रोडक्ट्स अधिक विकले जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे पुर्वी केवळ नायका वर ऑनलाईन हे ब्युटी प्रोडक्ट्स मिळत होते पण आता मॉल्समध्ये के ब्युटीचे आऊटलेट्स असल्यामुले ग्राहक थेट जाऊन खरेदी करण्यास देखील प्राधान्य देतात.
 
कैटरिना नंतर अभिनेत्री करिना कपूर हिनेदेखील शुगर कॉस्मेटिक्सची संस्थापक विनिता सिंह आणि कौशिक मुखर्जी यांच्यासोबतीने 'क्वैंच बोटैनिक्स' (Quench Botanics) हा कोरियन स्किन केअर ब्रॅण्ड सुरु केला आणि आता तीनपट अधिक या प्रोडक्ट्सची विक्री होत आहे. तसेच,अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनेदेखील 'एन्मोली' (Anomaly Hair Care) हा हेअर केअर ब्रॅण्ड लॉंच केला. ज्याने केवळ एका वर्षात २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
 
बड्या हिंदी कलाकारांच्या कंपन्या आणि प्रोडक्ट पुढीलप्रमाणे
 
संजय दत्त – ग्लेन वॉक – वाईन
सलमान खान – बीइंग ह्युमन – क्लोदिंग (२०११)
आलिया भट्ट – एड ए मामा – बेबी प्रोडक्ट्स (२०२०)
अक्षय कुमार – फोर्स IX -एक्सेसरीज (२०२२)
दीपिका पडूकोण – ८२ इस्ट – स्किन केअर (२०२२)
मनीष मल्होत्रा – मायग्लॅम – ब्युटी प्रोडक्ट्स (२०१७)
क्रिती सेनन – हाईफन – ब्युटी प्रोडक्ट्स (२०२२)
Powered By Sangraha 9.0