बायजूज मध्ये गडबड सुरू काय होणार बायजूजचे?

02 Apr 2024 17:28:58

BYJ
 
मुंबई: आज 'हिंदू बिझनेसलाईन' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अचानक ५०० कर्मचाऱ्यांना बायजूजने हाती नारळ दिला आहे. कंपनी आर्थिक अडचणीत सापडलेली असताना वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीप्रमाणे, कोणतीही सूचना न देता ५०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला गेला आहे.
 
एका कर्मचाऱ्याने वृत्तसेवेला सांगितल्याप्रमाणे, 'आज त्यांचा अखेरचा दिवस आहे' कंपनीने केलेल्या दाव्यानुसार कंपनीने ही कारवाई २०२३ मध्येच करण्याचे ठरवले होते. पुनर्रचनेचा भाग म्हणून कंपनीने हा कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला गेला आहे. रिस्ट्रक्चरिंगचा भाग म्हणून प्रकिया सोप्या करून वाढीव खर्चाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
 
याशिवाय आम्ही कठीण परीस्थितीतून जात असून परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कंपनीवरील दबावात वाढ झाल्याने हा रणनीतीचा भाग म्हणून ही कार्यवाही करण्यात आली आहे. कंपनीच्या चार गुंतवणूकदारांनी कंपनीविरोधात दंड थोपटले असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याला दबावाखालून जावे लागत आहे. 'असे कंपनीच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
 
नुकतेच कंपनीने राईट इश्यूमधून भागभांडवल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण) ने याबाबत मान्यता दिली असली तरी या निधीचा वापर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी मात्र अजून परवानगी थकित आहे. अद्याप ती परवानगी एनसीलटीकडून मिळाली नाही. गेले २ महिने बायजूज कर्मचाऱ्यांना त्यांचे मासिक वेतन मिळालेले नाही.
 
यापूर्वी बायजूज रविंद्रन यांनी कंपनी अंतर्गत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की कंपनीने ५० टक्क्यांहून अधिक मताधिक्याने राईट इश्यूमधून भागभांडवल वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.' एप्रिल ६ पर्यंत यावर कंपनी ठोस निर्णय घेणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0