उबाठाला मुस्लीम मतांची गरज नाही! स्वत: उमेदवारानेच केला दावा

02 Apr 2024 18:49:19
 

Bandu Jadhav
 
परभणी : आम्हाला निवडून येण्यासाठी मुस्लीम आमि मागासवर्गीय मतांची गरज नाही, असं वक्तव्यं उबाठा गटाचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय (बंडू) जाधव यांनी केले आहे. एका सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं असून त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
 
या व्हिडीओमध्ये संजय (बंडू) जाधव म्हणाले की, "आम्हाला मुसलमानांच्या आणि मागासवर्गींच्या मतांचीसुद्धा गरज राहणार नाही. आम्ही हिंदूंच्या मतांमध्येच भाजपचा खात्मा करु एवढी आमच्यात ताकद आहे," असे ते म्हणाले. दरम्यान, सध्या राजकीय वर्तुळात याच व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
 
हे वाचलंत का? -  नारायण राणेंचा गौप्यस्फोट, म्हणाले, "बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंसाठी माझ्याकडून शब्द..."
 
परभणी लोकसभेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे बंडू जाधव तर महायूतीकडून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणूकीआधीच बंडू जाधव यांनी आम्हाला निवडणूक येण्यासाठी मुस्लीम आमि मागासवर्गीय मतांची गरज नाही अशा वल्गना केल्या आहेत. त्यामुळे याचा निवडणूकीत परिणाम होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0