नव्या भारतात दरमहा ४३.३ कोटी डिजिटल व्यवहार

02 Apr 2024 18:24:26

Nirmala Sitharaman
मुंबई: भारतात मोदी सरकाकरने मोठ्या प्रमाणात डिजिटल इंडिया हा उपक्रम हाती घेतला होता. नोटबंदीनंतर व कोविडकाळात डिजिटल पेमेंट व्यवहारात लक्षणीय वाढ झाली होती. याच धर्तीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. 'विकसित भारत २०४७' या कार्यक्रमात बोलताना निर्मला सीतारामन यांनी दरमहा ४३.३ कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार होत असल्याचे म्हटले आहे.
 
या नव्या भारतात लौकांसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देण्यात आल्याचे सीतारामन यांनी निक्षून सांगितले आहे. 'भारत हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचे हब बनले आहे. मूलभूत सुविधा अशा प्रकारे नियोजित करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये वापरकर्ता व विक्रेता सोयीस्कर पद्धतीने व्यवहार करू शकतील. दरमहा ४३.३ कोटी डिजिटल व्यवहार होत आहेत ' असे विधान निर्मला सीतारामन यांनी जनतेला उद्देशून बोलताना केले आहे.
 
सीतारामन यांनी बोलताना बदललेल्या भारताच्या आर्थिक परिस्थितीविषयी भाष्य केले आहे ज्यामध्ये भारत हा केवळ मोबाईलचे उत्पादन करत नसून भारतातून मोबाईलची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे.मोदी सरकारच्या उपक्रमामुळे ही वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
प्रोडक्शन लिंक इन्सेक्टिव्ह (PLI) योजनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. विशेषतः सौर उर्जा व ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांना यामुळे मोठ्या प्रमाणात सहाय्य मिळाले असल्याचे सीतारामन यांनी यावेळी सांगितले आहे. याविषयी अधिक बोलताना आगामी काळात भारत रिन्यूएबल ऊर्जा निर्मितीमध्ये आघाडीचा देश असणार आहे' असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
 
याखेरीज स्टार्टअप इंडिया अंतराळ क्षेत्रातील आल्याने खाजगी गुंतवणूकदार यात प्रवेश करत आहेत व त्यातून भारत सरकार उद्योजकतेला चालना देण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन सीतारामन यांनी केले.
 
'मूलभूत सुविधा, आधुनिक शाळा, आधुनिक इस्पितळे ही विकसित भारताची द्योतक आहेत आणि या मूलभूत सुधारणेतुन आधुनिक विकसित भारताचा संकल्प आपण ठेवला असल्याचे शेवटी सीतारामन यांनी म्हटले आहे.
 
Powered By Sangraha 9.0