रायगडावर जाणे आता अधिक सुलभ; रोपवेच्या प्रवासी क्षमतेत वाढ

19 Apr 2024 16:57:37
 raigad ropway
 
रायगड : रायगड किल्ल्यावर जाणे आता अधिक सुलभ होणार आहे. रायगडावर जाण्यासाठी सध्या सुरु असलेल्या रोपवेच्या ( Raigad Ropeway ) प्रवासी क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. आता रोपवेच्या एका फेरी मध्ये एकाच वेळी २४ प्रवासी गडावर जाऊ शकणार आहेत. नुकतेच या नविन रोपवेच्या ट्रॉलींची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. येत्या २३ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या दिवशी या नविन ट्रॉलींचा लोकार्पण सोहळासुद्धा पार पडणार आहे.
 
रायगडावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा १९९६ साली सुरु झाली होती. याही वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच रोपवेचे लोकार्पण करण्यात आले होते. ही सुविधा सुरु झाली तेव्हा प्रत्येकी ४ प्रवासी क्षमता असलेल्या २ ट्रॉलींच्या माध्यमातुन ही सुविधा सुरु होती. त्यानंतर त्यात वाढ करुन प्रत्येकी ४ प्रवासी क्षमतेच्या ३ ट्रॉलींच्या माध्यातुन ही सुविधा सुरु होती. आता २३ एप्रिलला प्रत्येकी ६ प्रवासी क्षमतेच्या ४ ट्रॉलींच्या माध्यमातुन रोपवे सुविधा चालवली जाणार आहे. ज्यामुळे एकाच फेरीत अधिक प्रवाशांना रायगडावर जाणे शक्य होणार आहे.

हे वाचलत का ?- अहमदाबाद दिल्ली अंतर १२ तासांहून ३.५ तासांवर
 
येत्या चैत्र पोर्मिमेला म्हणजे दिनांक २३ एप्रिल २०२४ ला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४४ व्या पुण्यतिथी निम्मीत्ताने अभिवादन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहु चे अध्यक्ष ह. भ. प. श्री पुरुषोत्तम महाराज मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमावेळी नविन रोपवेचेही लोकार्पण केले जाणार आहे.
 
 
कशी आहे रोपवे सुविधा
या रोपवेतुन आता एकाच वेळी २४ प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. मिलेनियम प्रॉपर्टीज (पी) लिमिटेड या कंपनीद्वारे या रोपवेचे संचालन केले जात आहे. रोपवेचे दुतर्फा तिकीट प्रोढांसाठी ३१० रुपये असणार आहे. ३ ते ४ फुट उंटी असणाऱ्या लहान मुलांसाठी २०० रुपये तर, जेष्ठ नारगीकांसाठी (६० वर्षावरील ) २०० रुपये इतके असणार आहे. रोपवेच्या तिकीट दरात शालेय शैक्षणिक सहलींसाठी आणि २५ प्रौढांहुन अधिक नागरिकांच्या ग्रुप साठी विशेष सवलत देण्यात येणार आहे.
 
ही रोपवे सुविधा दिव्यांग शिवभक्तांसाठी मोफत असणार आहे. रोपवे तिकीट रायगड रोपवे तिकीट काउंटरवर जागेवर खरेदी करता येईल. त्याचबरोबर https://raigadropeway.com/ticket.html या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंगही करता येऊ शकते.

Powered By Sangraha 9.0