Q4 Results: जिओ फायनांशियल सर्विसेसचा तिमाही निकाल जाहीर; कंपनीला ३१० कोटींचा निव्वळ नफा

19 Apr 2024 19:19:14

JFS
 
मुंबई: जिओ फायनाशियल सर्विसेसने आपला चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केली आहे. कंपनीला जानेवारी ते मार्च तिमाहीत ३१० कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) २८० कोटी रूपयांवर गेले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 
मागील तिमाहीत कंपनीला २९३ कोटींचा निव्वळ नफा झाला होता. ही कंपनी ऑगस्ट महिन्यात शेअर बाजारात नोंदणीकृत झाली होती. कंपनीला मागील तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न २६९ कोटी रुपये नोंदवले गेले होते. एकूण उत्पन्नावरील व्याजात ४१४ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल ४१३ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचा एकत्रित करोत्तर नफा (Profit After Tax) मध्ये वाढ होत नफा १६०५ कोटींवर पोहोचला आहे. मागील तिमाहीतील करोत्तर नफा ७१ कोटींवर होता जो या तिमाहीत ७८ कोटींवर पोहोचला असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
 
निकाल शेअर बाजारातील सत्र संपल्यावर आले असताना सोमवारी जियो फायनाशियल सर्विसेसचे समभाग कसे प्रदर्शन करतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आज शेअर बाजारात जिओ कंपनीचा समभाग २ ते ८ टक्क्यांनी घसरला होता.
 
Powered By Sangraha 9.0